क्षुल्लक कारणावरून तरुणावर हल्ला
By Admin | Updated: August 6, 2015 00:03 IST2015-08-05T23:41:02+5:302015-08-06T00:03:55+5:30
चंदनझिरा : क्षुल्लक कारणावरून एका तरुणाच्या पोटावर कटर मारल्याची घटना नागेवाडी (ता. जालना) येथे ३ आॅगस्ट रोजी घडली. यात जखमी झालेल्या त्या तरुणाच्या

क्षुल्लक कारणावरून तरुणावर हल्ला
चंदनझिरा : क्षुल्लक कारणावरून एका तरुणाच्या पोटावर कटर मारल्याची घटना नागेवाडी (ता. जालना) येथे ३ आॅगस्ट रोजी घडली. यात जखमी झालेल्या त्या तरुणाच्या फिर्यादीवरून या प्रकरणी बुधवारी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेवाडी येथील विठ्ठल नारायण गिरी हे ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७. ३० वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना गावातील प्रभू भुसारे यांच्या दुकानासमोर राजू बाबूराव जाधव याने तू मला पाहुन का हसला, असे म्हणून शिवीगाळ केली व हातातील कटर गिरी यांच्या पोटावर मारले. त्यात गिरी जखमी झाले.
या प्रकरणी बुधवारी जाधव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.कॉ. अविनाश नरवडे हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार यु.पी. मतकर यांनी दिली. (प्रतिनिधी)