तेरी मेरी यारी ‘लई भारी’...

By Admin | Updated: January 11, 2015 00:55 IST2015-01-11T00:51:17+5:302015-01-11T00:55:50+5:30

महेश पाळणे , लातूर काही माणसं आभाळाइतक्या उंचीवर पोहोचूनही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहतात़ ही लातूरची संस्कृतीच आहे़ या संस्कृतीचा प्रत्यय आपला

You're my hero 'Lai Heavy' ... | तेरी मेरी यारी ‘लई भारी’...

तेरी मेरी यारी ‘लई भारी’...


महेश पाळणे , लातूर
काही माणसं आभाळाइतक्या उंचीवर पोहोचूनही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहतात़ ही लातूरची संस्कृतीच आहे़ या संस्कृतीचा प्रत्यय आपला ‘लई भारी’ हिरो रितेश देशमुखने आणून दिला़ मुंबईत सुरु असलेल्या सिलेब्रिटी क्रिकेट लीगचे सामने पाहण्यासाठी जन्मभूमी बाभळगावातील लंगोटीयारांना आवतन धाडून ‘यारी’ यशाहूनही भारी असते हे दाखवून दिले़
मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर सिलेब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल) स्पर्धेतील पहिला सामना पाहण्यासाठी चक्क आपल्या गावातील मित्रांना आमंत्रित केले़ लीग स्पर्धेतील पहिला सामना वीर मराठा विरुद्ध मुंबई हिरोज् शनिवारी झाला़ वीर मराठा संघाचे कर्णधारपद खुद्द रितेश विलासराव देशमुखने केले़ तर विरोधी संघ मुंबई हिरोज्चे नेतृत्व हिंदी अभिनेता सुनील शेट्टीने केले़ या सामन्यासाठी रितेशने खास बाभळगाव येथील मित्रांसाठी तिकिटे राखून ठेवली होती़ यात बाभळगावच्या प्रकाश आयरेकर, शाम दंडिमे, हणमंत शिंदे, दीपक जाधव, बप्पा बंडगर, माधव गोमारे, पिंटू मद्दे, अनिल शिंदे या मित्रांचा समावेश होता़
रितेशला बालपणापासूनच क्रिकेटची आवड़ शालेय जीवनात जरी मुंबईला शिकायला असला तरी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तो या मित्रांसमवेत कॉर्कबॉलवर क्रिकेट खेळायचा़ बाभळगावातील दयानंद विद्यालयाच्या मैदानावर या सवंगड्यासंगे तो आवर्जुन क्रिकेट खेळायचा़ उत्कृष्ट फलंदाजी व मध्यम गतीची गोलंदाजी असा अष्टपैलू खेळाडू तो आहे़ बाभळगावनजिक धनेगाव, बामणी, लोदगा, भातांगळी, पानचिंचोली व शिवणी या गावात तो बाभळगावची टीम घेऊन क्रिकेट स्पर्धेत सहभाग घ्यायचा़ प्रत्येक दौऱ्याला बाभळगावला आल्यावर तो जुन्या मित्रांना भेटायचा़ दिवाळी निमित्त आल्यानंतर या मित्रांसोबत चर्चा करताना क्रिकेटचा विषय निघताच त्याने त्यावेळी या स्पर्धेचे निमंत्रण दिले होते़ ही बाब त्याने विसरली नाही़ त्यामुळेच शनिवारी झालेल्या सामन्यात त्याने आपल्या मित्रांना हा सामना पाहण्यासाठी मुंबईला बोलावले़ नुकताच रितेशला ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोन’ यासाठी उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार मिळाला़ मराठीतील ‘लई भारी’ चित्रपटाला यातील अनेक पारितोषिके मिळाली़ हिंदी व मराठी चित्रपटात भूमिका करुन स्टार झालेल्या रितेशने आपली नाळ लातूरच्याच मातीशी जुळलेली असल्याचे यावरुन दाखवून दिले़
दुनियादारी चित्रपटातील डायलॉग प्रमाणे, तेरी मेरी यारी, भुलना नही जिंदगीभर सारी, असे म्हणाले तरी वावगे ठरणार नाही़

Web Title: You're my hero 'Lai Heavy' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.