‘तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे...’
By Admin | Updated: May 1, 2015 00:51 IST2015-05-01T00:36:27+5:302015-05-01T00:51:24+5:30
बीड : तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. कार्डवरील नंबर सांगा, ते मी सुरू करून देतो, अशा प्रकारचा फोन आला तर सावधान...

‘तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे...’
‘तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे...’
बीड : तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. कार्डवरील नंबर सांगा, ते मी सुरू करून देतो, अशा प्रकारचा फोन आला तर सावधान...तुमच्या कार्डची विचारणा करून तुमच्या खात्यावरील पैसे सहज काढून घेण्याचे प्रकार यापूर्वी उजेडात आले आहेत.
आजच्या स्थितीला सर्वसामान्य व्यक्तींकडे एटीएमकार्ड आले आहेत. परंतु त्याच्या वापराची माहिती अनेकांना नाही. त्यातच निनावी फोन करून एटीएम क्रमाकांची माहिती विचारून खात्यावरील पैसे काढले जात आहेत. बँकेचा अधिकारी बोलत असून, तुमच्या एटीएमचा पिन क्रमांक विचारून फसवणूक केली जायची. परंतु आता अत्याधुनिक पध्दतीने केवळ एटीएम कार्डवरील नंबर विचारून खात्यावरील पैसे काढण्याचा फंडा हायटेक चोर राबवत आहेत. असाच एक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईल क्रमाकांवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला तर त्याला खाते क्रमांक, एटीएम क्रमांक याची कोणतीच माहिती देऊ नये. जर असा फोन आलाच तर बँकेत जाऊन खातरजमा करावी. फोन कोणी केला, त्याचे नाव काय, याची विचारपूस करावी, परंतु आपली माहिती त्याला देऊ नये.
ई-मेल, मॅसेजवरूनही लूट
तुम्हाला एका कंपनीने काढलेल्या लकी ड्रॉमध्ये बक्षीस लागले आहे. ते २५ कोटी रूपयांचे आहे. ते पाहिजे असल्यास आमच्या खात्यावर एक लाख रूपये भरा, अशा आशयाच्या आॅफर ई-मेलवर गेल्या तीन वर्षांपासून येत आहेत. कोणती कंपनी, कोणता ड्रॉ कधी काढला, का काढला याची कोणतीही खातरजमा न करता अनेकजण या आॅफरला बळी पडतात. तसेच मोबाईलवरही अशाच प्रकारचे मेसेज आजही येत आहेत. असा कोणताच प्रकार घडत नसतो. बँक ग्राहकाने अत्यंत चौकसपणे प्रत्येक गोष्टीची शहानिशा करावी. शहानिशा केली तर हे सर्व बोगस असल्याचे आढळून येते. मात्र, अनेक जण लाभापोटी अशा लोकांच्या गळाला लागतात. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही अनेक जण त्याच चुका करीत आले आहेत. (प्रतिनिधी)