शहर बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे तरुणी बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:13+5:302021-02-05T04:20:13+5:30
औरंगाबाद : रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार तरुणी खाली कोसळली. याचवेळी पाठीमागून आलेली शहरबस तिच्या अंगावर गेली. मात्र, चालकाने प्रसंगावधान ...

शहर बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे तरुणी बचावली
औरंगाबाद : रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार तरुणी खाली कोसळली. याचवेळी पाठीमागून आलेली शहरबस तिच्या अंगावर गेली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून गाडीला ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलीस, पत्रकार यांनी मदत करून बसखाली दुचाकीसह पडलेल्या तरुणीला बाहेर काढले. या अपघातात तिच्या पायाला दुखापत झाली.
शहरातील तरुणी शासकीय दूध डेअरी चौकाकडून शहरात जात होती. क्रांतीचौकात ती रस्ता ओलांडत असताना चौकातील खड्ड्यात ती दुचाकीसह पडली. याचवेळी तिच्यामागून आलेल्या बसचालकाला हा प्रकार दिसला आणि त्याने प्रसंगावधान राखून बसला ब्रेक लावला. मात्र, तोपर्यंत बसखाली ती आणि दुचाकीचा काही भाग आला. क्रांतीचौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस, मराठा आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनी तेथे धाव घेऊन तरुणीला आणि तिच्या दुचाकीला बाहेर काढले. या घटनेत तरुणीच्या पायाला दुखापत झाली. तिला रस्त्यावरून बाजूला घेऊन खुर्चीवर बसविण्यात आले. यानंतर तिच्या नातेवाइकांना बोलावून तिला रुग्णालयात हलविण्यात आले. (फोटोसह)