लहानग्यांच्या कल्पक तेला मिळाला वाव

By Admin | Updated: August 31, 2016 00:40 IST2016-08-31T00:09:46+5:302016-08-31T00:40:48+5:30

औरंगाबाद : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या डेक्स्टरस किड्स पॉवर्ड बाय संकल्प फाऊंडेशन या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या

Young people get creative oil | लहानग्यांच्या कल्पक तेला मिळाला वाव

लहानग्यांच्या कल्पक तेला मिळाला वाव


औरंगाबाद : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या डेक्स्टरस किड्स पॉवर्ड बाय संकल्प फाऊंडेशन या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेला वाव देऊन अतिशय उत्कृष्ट कलाकृती तयार केल्या. लहानग्यांमध्ये लपलेली ही अचाट कल्पनाशक्ती भल्याभल्यांना थक्क करणारी होती.
पहिली ते पाचवी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी ‘न्यूजपेपर नेमप्लेट’, ‘लोगो विथ ए डिफरन्स’ आणि ‘फॅन्टास्टिक फ्लाईट’ या स्पर्धा घेण्यात आल्या.
वर्तमानपत्रांचा सुयोग्य पद्धतीने वापर करून विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक नेमप्लेट तयार केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेले आपापल्या शाळांचे लोगोदेखील छोट्याशा चिन्हाच्या माध्यमातून खूप काही बोलणारे होते. विमान, हेलिकॉप्टर, रॉकेट अशा हवेत उडणाऱ्या कलाकृती विद्यार्थ्यांनी ‘फॅन्टास्टिक फ्लाईट’ या विषयाअंतर्गत तयार केल्या
होत्या.
सहावी ते दहावी या वर्गांमधील विद्यार्थ्यांना ‘ब्रिज बिल्डिंग’ आणि ‘गारबेज मॅनेजमेंट’ हे विषय देण्यात आले होते. सामूहिक पातळीवर या स्पर्धा घेण्यात आल्या. एका समूहात चार ते पाच विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मनजित साळवे, हरीश दहीहंडे, सुनील भाले, अपूर्व हौजवाला, अजय ठाकूर, सुनील देवरे, नताशा झरीन, दीपक देशपांडे यांनी विविध स्पर्धांचे परीक्षण केले.
न्यूजपेपर नेमप्लेट स्पर्धा - प्रथम- केंब्रिज स्कूल, द्वितीय- औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कू ल, तृतीय- गोल्डन ज्युबिली स्कूल, उत्तेजनार्थ - बी. ए. जी. एम. स्कूल आणि सेंट लॉरेन्स इंग्लिश स्कूल
लोगो विथ ए डिफरन्स स्पर्धा - प्रथम- सेंट लॉरेन्स हायस्कूल, द्वितीय- औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल, तृतीय- केंब्रिज स्कूल, उत्तेजनार्थ - ज्ञानदा इंग्लिश स्कूल आणि जैन इंटरनॅशनल, माळीवाडा
फॅन्टास्टिक फ्लाईट स्पर्धा- प्रथम - औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल, द्वितीय- केंब्रिज स्कूूल, तृतीय- नाथ व्हॅली स्कूल, उत्तेजनार्थ - बी. एस. जी. एम. स्कूल व पोदार इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई)
ब्रिज बिल्डिंग स्पर्धा- प्रथम- सेंट लॉरेन्स हायस्कूल, द्वितीय- जैन इंटरनॅशनल स्कूल, माळीवाडा, तृतीय- केंब्रिज स्कूूल, उत्तेजनार्थ - एमजीएम क्लोव्हर डेल स्कूल आणि बी. एस. जी. एम. स्कूल
गारबेज मॅनेजमेंट स्पर्धा- प्रथम- सेंट लॉरेन्स हायस्कूल, द्वितीय- औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल आणि बी. एस. जी. एम. स्कूल, तृतीय- नाथ व्हॅली स्कूल, उत्तेजनार्थ - ज्ञानदा इंग्लिश स्कूल, पी. एस. बी. ए. स्कूल आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल (आयसीएसई)
चॅम्पियनशिप ट्रॉफीचे विजेते
सेंट लॉरेन्स हायस्कूल आणि औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल या शाळांना चॅम्पियनशिप ट्रॉफी विभागून देण्यात आली. केंब्रिज स्कूल हे या स्पर्धेचे फर्स्ट रनरअप असून बी. एस. जी. एम. स्कूल, नाथ व्हॅली, जैन इंटरनॅशनल स्कूल, माळीवाडा हे सेकंड रनरअप आहेत.

Web Title: Young people get creative oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.