तरुणाने नशेत घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:05 IST2021-07-30T04:05:46+5:302021-07-30T04:05:46+5:30

औरंगाबाद : दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करणाऱ्या तरुणास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आकाश भगवान बोदडे (२७, रा. ...

The young man took poison | तरुणाने नशेत घेतले विष

तरुणाने नशेत घेतले विष

औरंगाबाद : दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करणाऱ्या तरुणास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आकाश भगवान बोदडे (२७, रा. शहानगर) असे तरुणाचे नाव आहे. आकाशने बुधवारी रात्री ११ वाजता घरी दारूच्या नशेत विष घेतले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्याला घाटीत दाखल केले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

----------------------------------------

घरात खेळताना बालकाला विषबाधा

औरंगाबाद : घरात खेळताना बालकाने विषारी औषध प्राशन केल्याने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सय्यद सुफियान (५, रा. चिकलठाणा) असे बालकाचे नाव आहे. सुफियान हा बुधवारी रात्री घरात खेळत असताना त्याने चुकून विषारी औषध पिले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

----------------------------------------

विषारी किडा चावल्याने तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : शेतात अज्ञात विषारी किडा चावलेल्या मुलाचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. सोहेल सलीम पठाण (१५, रा. रहिमपूर, ता. गंगापूर) असे मुलाचे नाव आहे. सोहेल हा २६ जुलै रोजी दुपारी रहिमपूर शिवारातील चांद पटेल यांच्या शेतात गेला होता. या वेळी त्याला विषारी किड्याने दंश केला. प्रकृती बिघडल्याने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The young man took poison