तरुणाने विष घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:04 IST2021-07-27T04:04:26+5:302021-07-27T04:04:26+5:30

औरंगाबाद : अज्ञात कारणावरून विष प्राशन करणाऱ्या तरुणास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फईम खान कय्युम खान (वय ...

The young man took poison | तरुणाने विष घेतले

तरुणाने विष घेतले

औरंगाबाद : अज्ञात कारणावरून विष प्राशन करणाऱ्या तरुणास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फईम खान कय्युम खान (वय २२, रा. राशिदपुरा )असे तरुणाचे नाव आहे. फईम याने रविवारी रात्री अज्ञात कारणावरून घरी विषारी औषध प्राशन केले आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

......

तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीस घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांचन संग्राम साळवे (वय १९, रा. संसारनगर) असे तिचे नाव आहे. कांचनने रविवारी दुपारी बारा वाजता घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

.....

मारहाणीत तरुण जखमी

औरंगाबाद : मारहाण करण्यात आल्याने जखमी झालेल्या तरुणास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभय चंद्रशेखर लोखंडे (वय ३१, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अभयला २४ जुलै रोजी रात्री एकनाथनगर येथे मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The young man took poison