जळगाव रोडवर मध्यरात्री अपघात, तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:04 IST2021-01-08T04:04:36+5:302021-01-08T04:04:36+5:30

औरंगाबाद जाधववाडी येथून आंबेडकरनगरकडे येत असताना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. यात शुभम शहाजी लोखंडे(वय २३, ...

Young man killed in midnight accident on Jalgaon Road | जळगाव रोडवर मध्यरात्री अपघात, तरुण ठार

जळगाव रोडवर मध्यरात्री अपघात, तरुण ठार

औरंगाबाद जाधववाडी येथून आंबेडकरनगरकडे येत असताना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. यात शुभम शहाजी लोखंडे(वय २३, रा. आंबेडकरनगर ) याचा मृत्यू झाला असून हर्षद देवीदास गडवे याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, शुभम आणि हर्षल हे मंगळवारी रात्री नवा मोंढा जाधववाडी येथून मोटारसायकलने आंबेडकरनगर येथे जात होते. जळगाव रोडवरील रेणुकामाता मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघेही बाजूला फेकले गेले. या अपघाताची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या शुभमला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी रात्री १२.३० च्या सुमारास शुभमला तपासून मृत झाल्याचे सांगितले. गडवे यांच्यावर उपचार सुरू आहे. याविषयी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: Young man killed in midnight accident on Jalgaon Road