शहरं
Join us  
Trending Stories
1
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
2
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
3
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
4
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
5
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
6
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
7
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
8
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
9
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
10
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
11
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
12
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
13
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
14
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
16
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
17
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
18
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
19
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
20
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या रागातून दरवाजा तोडून तरुणाचे अपहरण; गंभीर मारहाणीने शरीरावर ७० टाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:54 IST

चित्रपटात शोभेल असा हल्ल्याचा थरार; कारचालक हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे येताच त्याने जीव वाचवत पळ काढला. त्यावेळी त्याने ११२ वर फोन करून माहिती दिली होती.

वाळूज महानगर : वडगाव (को.) येथे सोमवारी (दि. १७) रात्री १०:३० च्या सुमारास सहा जणांच्या टोळीने घरात घुसून ३० वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली. हल्ल्यात तरुणास तब्बल ७० टाके पडले असून त्याच्यावर वाळूजमधील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

जखमीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश जाधव हा काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घराशेजारी भाड्याने राहत होता. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा तरुण मोटारसायकलवरून जात असताना चोरडिया फार्महाऊसजवळ मागून आलेल्या कारने त्याला सलग दोनदा जोरदार धडक दिली. कारचालक हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे येताच त्याने जीव वाचवत पळ काढला. त्यावेळी त्याने ११२ वर फोन करून माहिती दिली होती. १७ नोव्हेंबरच्या रात्री योगेश जाधव हा प्रथम एका साथीदारासह त्याच्या घरासमोर आला.

तरुणाच्या पत्नीला आवाज देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले, पत्नीने त्यास सांगितले की, तू येथून निघून जा, विनाकारण वाद घालू नको, परंतु तो जोरजोरात दरवाजा वाजवत होता. दरवाजा न उघडल्याने तो परत फिरला आणि काही वेळात चार अनोळखींना घेऊन परत आला. सहा जणांनी मिळून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तरुणास लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याला जबरदस्ती कारमध्ये बसवून कांचनवाडीच्या दिशेने नेण्यात आले. मात्र कार काही अंतरावर बंद पडल्याने तरुणाने संधी साधून पळ काढला आणि जवळची पोलिस चौकी गाठली. पोलिसांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला वाळूज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या डोक्यास ७० टाके पडल्याचे फिर्यादीत म्हटले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चित्रपटात शोभेल असा हल्ल्याचा थरार१० नोव्हेंबर रोजी चोरडिया फार्महाऊसजवळ कार अचानक वेगाने येते आणि तरुणाला सलग दोनदा उडवते. हातात लोखंडी रॉड घेऊन बाहेर पडणारा हल्लेखोर व तरुणाने तेथून काढलेला पळ. पण ही फक्त सुरुवात होती. १७ नोव्हेंबरच्या रात्री सहा जण थेट घराचा दरवाजा फोडून आत शिरतात आणि लोखंडी रॉडने निर्दयीपणे मारहाण करून त्याला जबरदस्ती कारमध्ये ढकलून अपहरण करतात. टोळीने लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत तरुणाच्या डोक्यास तब्बल ७० टाके घातले असून पाठीवर व हातावर खोल जखमा आहेत.

अनैतिक संबंधातून उफाळलेली हिंसाकाही महिन्यांपासून पेटलेला संशय, अनैतिक संबंधाचा ताप आणि पूर्वीचा वाद यांचा मिलाफ होऊन या हल्ल्याने उग्र रूप धारण केले. या घटनेचा सूत्रधार योगेश जाधव आहे, तर त्याच्यासोबत आणखी पाच अनोळखी इसम होते. सहा जणांची ही टोळी घर फोडून, हल्ला करून आणि अपहरणाचा प्रयत्न करून पसार झाली.

आरोपींचा थरारक पाठलाग, दोन आरोपींसह कार ताब्यात१७ नोव्हेंबरच्या रात्री १०:३० वाजता झालेल्या लोखंडी रॉडने मारहाण व अपहरणाच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अत्यंत जलद आणि अचूक कामगिरी करत दोन्ही मुख्य आरोपींना स्वीफ्ट कारसह ताब्यात घेतले. फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करून अपहरण करणारे योगेश नामदेव जाधव (३१, रा. म्हारोळा, ता. पैठण) आणि दिनेश सोबकचंद मेहर (३४, रा. पेंढापूर, ता. गंगापूर) हे आरोपी पकडण्यात आले. या धडक कारवाईत पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोउपनि अर्जुन कदम तसेच गुन्हे शाखेतील पोह. योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, दत्तात्रय गढेकर, पोअं. दादासाहेब झारगड आणि सोमनाथ दुकळे यांनी विशेष कामगिरी बजावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Jealousy Fueled Assault: Man Kidnapped, Severely Beaten, Enduring 70 Stitches

Web Summary : A 30-year-old man was attacked and kidnapped in Waluj due to suspected infidelity. Six assailants broke into his home, inflicting severe injuries requiring 70 stitches. Police arrested two suspects following the violent incident, highlighting the escalating tensions from prior disputes.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी