मध्यरात्री वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:12 PM2024-01-11T13:12:34+5:302024-01-11T13:13:20+5:30

आज सकाळपासून नदी पात्रात त्याच्या शोध सुरू आहे.

Young man drowned in Godavari riverbed while smuggling sand at midnight | मध्यरात्री वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू

मध्यरात्री वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू

गेवराई : अवैध वाळू उपसा करताना केणीवर काम करणारा अंबड तालुक्यातील ३० वर्षाय तरूण सावळेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात बुडल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. शेख नबी शेख खबीब असे तरुणाचे नाव आहे. आज सकाळपासून नदी पात्रात त्याचा शोध सुरू आहे.

शेख नबी शेख खबीब हा अंबड तालुक्यातील ताडहातगाव येथील रहिवासी आहे. सावळेश्वर येथील गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री हा तरुण केणीद्वारे वाळू उपसा करण्याचे काम करत होता. अचानक तो नदी पात्रात बुडाला. आज सकाळी माहिती मिळताच गेवराई पोलिस घटनास्थळी पोहचल. अद्याप तरुणाचा शोध लागला नाही.

Web Title: Young man drowned in Godavari riverbed while smuggling sand at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.