जेवताना ठसका लागून तरुणाचा मृत्यू
By | Updated: December 4, 2020 04:14 IST2020-12-04T04:14:28+5:302020-12-04T04:14:28+5:30
पोलिसांनी सांगितले, राम सुकासे, परमेश्वर उगले, शुभम काळे हे तिघे तुर्काबादखराडी येथून कापसाची गाडी खाली करून आले. भूक ...

जेवताना ठसका लागून तरुणाचा मृत्यू
पोलिसांनी सांगितले, राम सुकासे, परमेश्वर उगले, शुभम काळे हे तिघे तुर्काबादखराडी येथून कापसाची गाडी खाली करून आले. भूक लागल्यानंतर रात्री ते दहेगाव बंगला येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले. जेवण सुरू असताना राम सुकासे याला जोराचा ठसका लागला. त्याची परिस्थिती पाहता, त्यास परमेश्वर व शुभमने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रात्री १२ वाजता त्याला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण बुट्टे करीत आहेत.