शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

हॉटेलमध्ये चाकू, दगडाने हल्ला झालेल्या तरुणाचा मृत्यू; पोलिस येताच मारेकऱ्याचे स्वतःवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:37 IST

मारेकरी आत्महत्येच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कुशलतेने परिस्थिती हाताळत त्याला ताब्यात घेतले.

छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसांपूर्वी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर सुखदेव ढोकळे (वय २३) यांचा सोमवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अटक अटळ दिसताच एका मारेकऱ्याने खोलीत कोंडून घेत चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, चिकलठाणा पोलिसांनी सतर्कता दाखवत चाकू हिसकावून त्याला ताब्यात घेतले.

मुकुंदवाडीतील शिवशाहीनगरमध्ये कुटुंबासह राहणारे सागर एका मेडिकल एजन्सीमध्ये कामाला होते. ५ एप्रिल रोजी रात्री ते बीड बायपासवर ‘हॉटेल तडका’त गेले होते. तेव्हा काही टवाळखोर हॉटेलमध्ये धिंगाणा घालत होते. त्यांनी सागर यांना नाहक शिवीगाळ केली. मांडी, पोटात चाकूने वार केले. एकाने डोक्यात दगड घातला. त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रविवारी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्वतःवर चाकूने वारसागर यांच्या मृत्यूनंतर चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे, सहायक निरीक्षक समाधान पवार, उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी रुग्णालयात धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. हल्लेखोरांपैकी राहुल सिद्धेश्वर भोसले हा त्याच्या हनुमाननगरच्या घरी आल्याचे समजले. दरवडे, पवार तेथे गेले. मात्र, भोसलेने आरडाओरड सुरू केली. घरात कोंडून घेत चाकूने स्वत:वर वार केले. तो आत्महत्येच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कुशलतेने परिस्थिती हाताळत त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तेरा दिवसांपूर्वी मुलगा झालासागर यांचे वडील खासगी नोकरी करतात. सागर यांना दीड वर्षाची मुलगी असून, १३ दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. पत्नी व बाळावरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी