यू ट्युब पाहत तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या; औरंगाबादमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 06:44 IST2021-03-24T06:44:33+5:302021-03-24T06:44:44+5:30
सचिन प्रकाश अहिरे (२६, रा. आनंदवाडी, जेतवन कॉलनी, कल्याण, जि. ठाणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत सचिनची औरंगाबाद शहरातील भीमराज नगरात सासुरवाडी आहे.

यू ट्युब पाहत तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या; औरंगाबादमधील घटना
औरंगाबाद : मुलाला नेण्यासाठी ठाणे येथील सासुरवाडीत आलेल्या तरुणाने यू ट्युब पाहत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. किरकोळ कारणावरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सूत्राने सांगितले. ही घटना हिमायतबाग परिसरातील भीमराज नगरात घडली.
सचिन प्रकाश अहिरे (२६, रा. आनंदवाडी, जेतवन कॉलनी, कल्याण, जि. ठाणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत सचिनची औरंगाबाद शहरातील भीमराज नगरात सासुरवाडी आहे. माहेरी आलेल्या पत्नी आणि मुलाला नेण्यासाठी तीन-चार दिवसांपूर्वी तो सासुरवाडीत आला होता. तो चार वर्षाच्या मुलाला नेण्यासाठी आल्याचे सांगत होता. त्याची पत्नी आणि सासरची मंडळी मात्र फक्त मुलाला पाठविण्यास नकार देत होते. यावरून त्यांच्यात कुरबुर झाली होती. दरम्यान, रात्री सर्व जण जेवण करून झोपल्यावर सचिनने छताच्या लाकडी बल्लीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.