रेल्वेरुळावर तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:41+5:302021-02-05T04:16:41+5:30
करमाड : मानसिक तणावातून रेल्वेरुळावर २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येस परावृत्त केल्याने चार जणांवर करमाड पोलीस ठाण्यात ...

रेल्वेरुळावर तरुणाची आत्महत्या
करमाड : मानसिक तणावातून रेल्वेरुळावर २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येस परावृत्त केल्याने चार जणांवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ जानेवारी रोजी मध्यरात्री लाडगाव येथील गणेश संदीपान इत्थर या तरुणाने रेल्वेरुळावर जाऊन आत्महत्या केली होती. हॉटेलवर जेवताना मित्रांमध्ये झालेल्या वादातून मित्रांनी गणेशला मारहाण केली. त्यामुळे मानसिक तणावात येऊन गणेशने आत्महत्या केली, अशी चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. २९ जानेवारी रोजी गणेशचे वडील संदीपान इत्थर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी ज्ञानेश्वर बागल (२४), किशोर ज्ञानेश्वर बागल (२२) , भाऊसाहेब सुदाम इत्थर (२५ )राहुल पाटील (२८)सर्व रा.लाडगाव) गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षराचा तपास करण्याची कायदेशीर कारवाई पोलीस करीत आहेत. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू नागलोत व त्यांचे सहकारी करीत आहेत. (फोटो)