किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण
By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:42+5:302020-11-28T04:11:42+5:30
========== तीन जुगाऱ्यांवर कारवाई औरंगाबाद: किलेअर्क परिसरातील समाजकल्याण मुलांचे वस्तीगृहाशेजारी पत्ते खेळणाऱ्या तीन जणांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ...

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण
==========
तीन जुगाऱ्यांवर कारवाई
औरंगाबाद: किलेअर्क परिसरातील समाजकल्याण मुलांचे वस्तीगृहाशेजारी पत्ते खेळणाऱ्या तीन जणांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि ३ हजार ३७० रुपये जप्त केले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
===========
अवैध दारू विक्री प्रकरणी महिलेवर कारवाई
औरंगाबाद : चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्या महिलेवर २६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी कारवाई केली. जाफरगेट परिसरात झालेल्या या कारवाईत ४१६ रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. पोलीस हवालदार पांडुरंग वाघमारे यांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
========
वीज चोराविरुद्ध कारवाई
औरंगाबाद : हडको एन १२ येथील सुरेश शिखरे याला दोन वर्षांपासून वीज चोरी करताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबर रोजी पकडले. याप्रकरणी अभियंता मनीष मधुकर अंभोरे यांच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात शिखरेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
========
दुचाकीला उडविणाऱ्या जीपचालकाविरुध्द गुन्हा
औरंगाबाद : राँग साईड जाणाऱ्या जीपच्या (एम एच २० सीटी ४६८७) धडकेत दुचाकीस्वार उमाकांत रामचंद्र कांबळे (३५, रा. सिडको महानगर) हे जखमी झाले. २३ रोजी रात्री पडेगाव रोडवर झालेल्या या घटनेविषयी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
=======