नातेवाईक तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST2021-05-09T04:05:07+5:302021-05-09T04:05:07+5:30

विशाल हिराजी कोलते (रा. पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. सूत्राने सांगितले की, गतवर्षी डिसेंबर महिन्यात १७ वर्षीय पीडिता ...

Young man arrested for abusing a relative | नातेवाईक तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

नातेवाईक तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

विशाल हिराजी कोलते (रा. पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. सूत्राने सांगितले की, गतवर्षी डिसेंबर महिन्यात १७ वर्षीय पीडिता पडेगाव परिसरातील नातेवाइकांच्या घरी आली होती. तेथे आरोपीसोबत तिची भेट झाली. त्याने गोडबोलून तिच्यासोबत जवळीक निर्माण केली. २८ डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी या कालावधीत त्याने तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान ती गावी गेली असता तेथे तिचे पोट दुखत असल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आले असता तिला गर्भधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पीडितेने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. घटना औरंगाबादला घडलेला असल्याने हा गुन्हा तपासासाठी छावणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी छावणी ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. फौजदार डाके यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू करून आरोपी विशाल यास अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Young man arrested for abusing a relative