दगड मारल्याने तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:04 IST2021-06-10T04:04:47+5:302021-06-10T04:04:47+5:30

आकाश राजू रुम व त्याचा मित्र रमेश जगदाळे हे दोघे बुधवारी दुपारी दत्तनगर फाट्यावरून घरी चालले होते. या मार्गावरील ...

Young injured by stone throwing | दगड मारल्याने तरुण जखमी

दगड मारल्याने तरुण जखमी

आकाश राजू रुम व त्याचा मित्र रमेश जगदाळे हे दोघे बुधवारी दुपारी दत्तनगर फाट्यावरून घरी चालले होते. या मार्गावरील वाईन शॉपजवळ आकाशच्या ओळखीचा समाधान ऊर्फ सोनू लोखंडे हा मद्य प्राशन करून बसला होता. आकाशला पाहून समाधानने त्यास हाक मारली. गुटका पुडी खाण्यासाठी पैसे मागितले. आकाशने पैसे देण्यास नकार दिला, मात्र त्याच्या खिशातील ५०० रुपयाची नोट खाली पडली. समाधानने ती नोट उचलली. परंतु तो परत देईना. बाजूला पडलेला दगड उचलून त्याने आकाशच्या कानाजवळ फेकून मारला. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुला बघून घेईन, अशी धमकी देत तो पसार झाला. जखमी आकाशला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आरोपी समाधान ऊर्फ सोनू लोखंडे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फोटो क्रमांक- आकाश रुम (जखमी)

----------------------

Web Title: Young injured by stone throwing