तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:02 IST2021-07-04T04:02:16+5:302021-07-04T04:02:16+5:30
संतोष हाके हे सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथील आहेत. त्यांच्याकडे शेती नसल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर ...

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
संतोष हाके हे सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथील आहेत. त्यांच्याकडे शेती नसल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर यंदा त्यांनी सोयगावमधील धनवट येथील एकाची शेती करण्यासाठी घेतली होती. शुक्रवारी ते घरात कोणालाही न सांगता बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, शनिवारी सकाळी सावरखेडा घाटात एक इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेह हा संतोष हाके यांचा असल्याची ओळख पटली. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस कर्मचारी सचिन केंद्रे, धनराज खाकरे पुढील तपास करीत आहेत.
--
फोटो नाही.