विजेच्या खांबावरून पडून तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:05 IST2020-12-22T04:05:21+5:302020-12-22T04:05:21+5:30

दौलताबाद : विजेच्या खांबावर काम करीत असलेल्या महावितरणच्या तरुण कर्मचाऱ्याचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना २० डिसेंबर रोजी ...

A young employee dies after falling from a power pole | विजेच्या खांबावरून पडून तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू

विजेच्या खांबावरून पडून तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू

दौलताबाद : विजेच्या खांबावर काम करीत असलेल्या महावितरणच्या तरुण कर्मचाऱ्याचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना २० डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. पद्माकर जनार्दन पाटेकर (वय ४०) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

दौलताबादेतील आम मशीदसमोर असलेल्या विजेच्या खांबावर तांत्रिक बिघाड झाला होता. तेव्हा नागरिकांनी तक्रार करताच महावितरण कर्मचारी पद्माकर पाटेकर व त्यांचे अन्य सहकारी दुरुस्तीसाठी गेले. पद्माकर पाटेकर हे खांबावर चढले. दुरूस्ती करताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला यावेळी ते खाली कोसळले. बेशुद्ध अवस्थेत त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

चार महिन्यांपूर्वीच आले होते साजापूरला

पद्माकर पाटेकर हे दहा वर्षांपासून महावितरणमध्ये कार्यरत होते. यापूर्वी ते नगर जिल्ह्यात कर्तव्यावर होते. चार महिन्यांपूर्वीच साजापूर येेथे बदली झाली होती. तर महिनाभरापूर्वीच ते मूळ गाव दौलताबाद येथे रुजू झाले होते. मनमिळावू कर्मचारी गेल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: A young employee dies after falling from a power pole