नाथसागरात तरुण बुडाला, शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:03 IST2021-06-22T04:03:57+5:302021-06-22T04:03:57+5:30

भिंगार येथील रहिवासी आदेश शिरसाठ हा तरुण पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथे नातेवाइकाच्या विवाह सोहळ्यासाठी आला होता. दरम्यान मित्रांसह सोमवारी ...

Young drowned in Nathsagar, search continues | नाथसागरात तरुण बुडाला, शोध सुरू

नाथसागरात तरुण बुडाला, शोध सुरू

भिंगार येथील रहिवासी आदेश शिरसाठ हा तरुण पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथे नातेवाइकाच्या विवाह सोहळ्यासाठी आला होता. दरम्यान मित्रांसह सोमवारी दुपारी जायकवाडी धरणावर आला. यावेळी त्याने पोहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र; जोरदार वाऱ्यामुळे नाथसागरात लाटा उसळत असल्याने मित्राने नकार दिला. यानंतर सदर मित्र हा इतरांसोबत धरण पाहण्यासाठी गेल्यानंतर इकडे आदेशने मित्राचा सल्ला न ऐकता पाण्यात उडी मारली. पाण्यात लाटा उसळत असल्याने त्याला पोहता आले नाही व तो पाण्यात बुडाला.

तो बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोनि. किशोर पवार, सपोनि. गजानन जाधव, रामकृष्ण सागडे, सुधीर ओव्हळ, राजू आटोळे आदींनी धरणावर धाव घेऊन स्थानिक मच्छीमार व पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आदेश आढळून आला नव्हता. दरम्यान औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला शोधकार्य करण्यासाठी बोलाविण्यात आल्याची माहिती पोनि. पवार यांनी दिली.

फोटो :

210621\img_20210621_203859.jpg

आदेश शिरसाठ

Web Title: Young drowned in Nathsagar, search continues