कानाखाली आवाज काढताच ‘तो’ म्हणाला, ताई माफ कर...

By Admin | Updated: June 23, 2016 01:27 IST2016-06-23T01:02:20+5:302016-06-23T01:27:26+5:30

औरंगाबाद : शाळा असो की कोचिंग क्लास, येता-जाता ‘तो’ तिचा पाठलाग करायचा, छेड काढायचा... अनेकदा समजूत घातल्यानंतरची तो काही सुधारेना.

'You' said, 'sorry for Tai ... | कानाखाली आवाज काढताच ‘तो’ म्हणाला, ताई माफ कर...

कानाखाली आवाज काढताच ‘तो’ म्हणाला, ताई माफ कर...


औरंगाबाद : शाळा असो की कोचिंग क्लास, येता-जाता ‘तो’ तिचा पाठलाग करायचा, छेड काढायचा... अनेकदा समजूत घातल्यानंतरची तो काही सुधारेना. शेवटी प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी पकडून त्याला ठाण्यात आणले. ‘तो’ समोर येताच त्या शाळकरी मुलीचा पारा अनावर झाला अन् तिने त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढला... झनझण्या येताच आतापर्यंत ‘डियर’ म्हणणाऱ्या ‘त्याने’ ताई मला माफ कर, चूक झाली, असे म्हणत पायच धरले...
छेड काढणारा हा मुलगा अल्पवयीन असल्याने क्रांतीचौक पोलिसांनी ‘समज’देऊन नंतर त्याला सोडले. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
त्याचे झाले असे की, शहरातील मध्यवर्ती भागात शिक्षण घेणारी १३ वर्षीय मुलीला गेल्या अनेक दिवसांपासून १४ वर्षीय मुलगा त्रास देत होता. तो पाठलाग करीत तिच्या शाळेत जात असे. कोचिंग क्लासलाही जात असे. काही दिवसांपासून क्लास पार्किंगमध्ये अडवून तिची छेड (पान २ वर)

Web Title: 'You' said, 'sorry for Tai ...