योगेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्याने झाली सांगता

By Admin | Updated: October 12, 2016 23:33 IST2016-10-12T23:32:49+5:302016-10-12T23:33:49+5:30

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या सीमोल्लंघनाने निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.

Yogeshwari said that the Goddess Palkhi celebrated the festival | योगेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्याने झाली सांगता

योगेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्याने झाली सांगता

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या सीमोल्लंघनाने निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. शहर व परिसरातील हजारो भाविकांनी देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंगळवारी दुपारी योगेश्वरी देवी मंदिरात विधीवत महापुजेनेनंतर पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली. फटाक्यांची आतिषबाजी, पारंपारिक वाद्य, ढोलताशांचा गजर व आराधी भाविकांचे भजनी मंडळ यांच्या मेळ्यात पालखीचे मार्गक्रमण झाले. शहरात ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांची गर्दी होती.
आराधी महिलांना फराळाचे वाटप
योगेश्वरी देवीच्या पालखीसमोर असणाऱ्या आराधी महिलांना स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आराधी महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तीन हजार महिलांना फराळाचे वाटप झाले.
यावेळी ट्रस्टचे संयोजक उद्योगपती रसिक कुंकुलोळ, संतोष कुंकुलोळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आराधी महिला व भाविकांना फराळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविवारपेठ मित्र मंडळाचे आनंद टाकळकर, डॉ. आनंद देशपांडे, सुनिल मुथा, ज्ञानेश्वर पाटील, महेश नाईक, सतीश दहातोंडे, किरण सेलमोहकर, बाळा पाथरकर, मुन्ना सांगवीकर, प्रशांत सेलमोहकर, गणेश जोशी, संतोष दहातोंडे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Yogeshwari said that the Goddess Palkhi celebrated the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.