जिल्हाभरात योगासने
By Admin | Updated: June 22, 2015 00:19 IST2015-06-21T23:38:47+5:302015-06-22T00:19:06+5:30
जालना : जिल्हाभरात विविध शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हाभरात योगासने
जालना : जिल्हाभरात विविध शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जळगाव सपकाळ
येथील विनय विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. सुरूवातीला जी.एस. सर यांनी प्रस्ताविक करून योगाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापक डी.टी. देशमुख यांनी सुक्ष्म व्यायाम, योगासन आणि प्राणायामाची प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक, भुतेकर, झाल्टे, पालकर, शेरे, राठोड, सुसर, बावस्कर, बाबुदादा सपकाळ आदींची उपस्थिती होती.
पारध
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता विद्यालयात रविवारी योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे शारीरिक शिक्षक बी.एस. येवले, क्रीडा विभाग प्रमुख महेंद्र लोखंडे, प्रा. संग्राम देशमुख यांनी विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे विविध प्रकार सांगून प्रात्यक्षिक करून घेतले. संस्थेचे अध्यक्ष बी.एम. लोखंडे यांनीही योगा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी सामुहिक प्रात्यक्षिक केले. यावेळी प्राचार्य सतीश चौथमल, संचालिका शर्मिला लोखंडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरूड
वरूड बु. : येथे भारतमाता कनिष्ठ महाविद्यालय, न्यु. हायस्कूल, केंद्रीय प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी योगाची विविध आसने करून विश्व योग दिन साजरा केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी भुजंगासहन, सेतुबंधासन, वक्रासन, भद्रासन, पवनमुक्रासन, मकरासन, वृश्र्वासन, पादहस्तासन, अर्धउष्ट्रासन आदी आसने केली. प्रशिक्षक म्हणून ए.एच. भोपळे, बी.टी. शिंदे, ए.एन. घुले यांनी काम पाहिले. याप्रसंगी प्राचार्य जी.एन. सपकाळ, मुख्याध्यापक बी.एल. भिसे, मुख्याध्यापक संजय इंगळे, केंद्रप्रमुख पी.बी. देवकर, ई.ए. शेवत्रे, एन.मेरत, आर.आर. देशमुख, एन.के. कड, पी.डी. राजपूत, व्ही.डी. सुसर, ए.बी. शिंदे, एस.डी. वैराळ, सुरडकर, ए.बी. सोळंके, भोकरे, पी.एन. दांडगे, एस.एन. मुखाडे, एस.एस. जायगुडे, एस.जे. साबळे, पी.बी. मलिये, आर.एस. गाढवे, जी.एस. कन्नेवार, स्वप्नील वायाळ, राजू जैन आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूर्ती
कुंभार पिंपळगाव : शरदचंद्रजी पवार माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मूर्ती ता. घनसावंगी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक सोळंके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योग शिक्षक एस.के. कायंदे यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी दररोज योगा करण्याचा संकल्प शिक्षक, विद्यार्थ्यांनी सोडला. तसेच परिसरातील अन्य शाळेतही योग दिन साजरा करण्यात आला.
जामवाडी
जामवाडी : जालना तालुक्यातील जामवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत रविवारी सकाळी योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थनेने झाली. यावेळी योग प्रशिक्षक एस.व्ही. हसनपुरे यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रकार सांगितले व त्यांच्याकडून करवून घेतले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षासह पालक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शिक्षिका एस.आर. सपकाळ, एस.के. काळे, आर.आर. नाडे आदींनी सहकार्य केले.
आव्हाना
आव्हाना : आव्हाना येथील श्री आत्मानंद विद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुपेसह सर्व शिक्षक, विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी झाले होते. यावेळी सकाळी ७ ते ७. ३३ या वेळेस सर्वांनी सामूहिक योग प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सामूहिक प्रार्थना घेवून योग समारोप करण्यात आला. यापुढेही प्रत्येक दिवशी योगा करावा, असे यावेळी क्रीडा शिक्षक व्ही.एल. जाधव यांनी सांगितले. यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.