लोकमततर्फे आजपासून योगा, प्राणायाम शिबीर

By Admin | Updated: June 17, 2016 00:38 IST2016-06-17T00:08:18+5:302016-06-17T00:38:44+5:30

औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Yoga, pranayama camp from today's Lokmat | लोकमततर्फे आजपासून योगा, प्राणायाम शिबीर

लोकमततर्फे आजपासून योगा, प्राणायाम शिबीर

औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिबिरात सहभागी होणाऱ्या पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
हे शिबीर विनामूल्य असून यात योग, ध्यान व प्राणायामाबदल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरात १५ वर्षे वयोगटावरील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकणार आहे. सोबत सतरंजी वा बेडशीट आणावे. सैलसर कपडे परिधान करून यावेत.
सखी मंच सदस्यांनाही संधी
योगा, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिरात लोकमत सखी मंचच्या सदस्यांनाही सहभागी होता येणार आहे. जालना रोडवरील लोकमत भवनच्या पाठीमागील हॉलमध्ये सर्वांसाठी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत शिबीर घेण्यात येईल.

Web Title: Yoga, pranayama camp from today's Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.