योगामुळे वाटले ताजेतवाने...
By Admin | Updated: June 18, 2016 01:03 IST2016-06-17T23:57:45+5:302016-06-18T01:03:54+5:30
औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

योगामुळे वाटले ताजेतवाने...
औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या शिबिरास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
शिबिराच्या पहिल्या दिवशी हलके- फुलके व्यायाम प्रकार शिकवून योग अभ्यासाची सुरुवात झाली. मानेचे दुखणे असणाऱ्यांसाठी तसेच पाठीचे दुखणे असणाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम शिकविण्यात आले. आसन तसेच प्राणायाम शिकवून ते करण्याचे फायदेही सोप्या शब्दांत विशद केले गेले. आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे डॉ. नमिता हजारी, संगीता पाटील, छाया भालेकर, सुलभा भालेकर यांनी मार्गदर्शन केले.
हे शिबीर सर्वांसाठी विनामूल्य असून, १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. शनिवारी सकाळी सात वाजता लोकमत भवनच्या मागील बाजूच्या हिरवळीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येताना प्रत्येकाने स्वत:ची सतरंजी सोबत घेऊन यावी. प्रवेश मागील गेटने राहील.
योगा, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिरात लोकमत सखी मंचच्या सदस्याही सहभागी होऊ शकतात. यानिमित्ताने योगा शिकण्याची अनोखी संधी सखी मंच सदस्यांना प्राप्त होत आहे.