योगा स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:59 IST2019-02-01T00:59:26+5:302019-02-01T00:59:41+5:30
गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी १७ वर्षांखालील वर्चस्व राखले आहे. दुसऱ्या दिवसअखेर सांघिक प्राथमिक फेºयांत महाराष्ट्राचा संघ १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल स्थानावर आहे, तर पश्चिम बंगाल दुसºया व दिल्ली तिसºया क्रमांकावर आहे. मुलींच्या गटात या तिन्ही संघांतच चुरस रंगली आहे.

योगा स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी १७ वर्षांखालील वर्चस्व राखले आहे.
दुसऱ्या दिवसअखेर सांघिक प्राथमिक फेºयांत महाराष्ट्राचा संघ १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल स्थानावर आहे, तर पश्चिम बंगाल दुसºया व दिल्ली तिसºया क्रमांकावर आहे. मुलींच्या गटात या तिन्ही संघांतच चुरस रंगली आहे.
वैयक्तिक १७ वर्षांखालील मुलींच्या योगा प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात महाराष्ट्राच्या साक्षी काटे, तनुश्री पळंदूरकर, प्राप्ती किनारे, गौरी डावके, तन्वी कुंभार यांनी पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या अद्रिता सरकार, ज्योती शुवरा, स्नेहल दास, सी.आय.एस.ई.ची सुब्रना मैती, दिल्लीची खुशी, भूमिका साहू, संजना, त्रिपुराची शैली देबनाथ यांनीही अंतिम फेरी गाठली आहे.
मुलांच्या गटात ऐश्चिक योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या मनन कासलीवाल, प. बंगालचा सोमीनाथ मुखर्जी, संतान डे, संदीप साहू, महाराष्ट्राचा आयुष गोरे, अभिजित सावंत, दिल्लीचा नकुल मान, महाराष्ट्राचा सुमित पोटे, प. बंगालचा साहित्य प्रतिहार, दिल्लीचा मोहंमद अरमान, त्रिपुराचा दीपजॉय दास, तन्मय दास यांनी पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्याच्या सत्रात १४ व १७ वयोगटातील सांघिक व अंतिम स्पर्धा रंगणार आहे. रिदमिक व आर्टिस्टिक प्रकाराच्या प्राथमिक फेरीस सुरुवात होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी कळवले आहे.