निरोगी जीवनासाठी योगा सर्वोत्तम मार्ग !
By Admin | Updated: June 22, 2015 00:20 IST2015-06-22T00:01:06+5:302015-06-22T00:20:35+5:30
लातूर : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त लातुरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, नागरिक, शासन सेवेतील कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलावर

निरोगी जीवनासाठी योगा सर्वोत्तम मार्ग !
लातूर : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त लातुरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, नागरिक, शासन सेवेतील कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलावर योगसाधना करुन आंतरराष्ट्रीय योगदीन उत्साहात साजरा केला़ आधुनिक युगात माणसांची जीवनशैली रोगांना निमंत्रण देणारी आहे़ खानपाण आणि राहणीमानामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे़ परिणामी, आरोग्य बिघडल्यानंतरच त्याकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती आहे़ त्यामुळे निरोगी जीवनापासून माणसे वंचित आहेत़ या सर्व समस्यावर मात करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यावेळी म्हणाले़ क्रीडा संकुलावर खा़सुनिल गायकवाड, आ़विक्रम काळे, अॅड़ त्र्यंबकदास झंवर, शिवलिंग शिवाचार्य महाराज, जि़पा़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जि़प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा आयुष अधिकारी डॉ़ सुधीर बनशेळकीकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी योग साधना करण्यात आली़ या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, जगातील १९२ देशात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे़ जगाला योगाने मान्यता दिली असून, निरोगी राहण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे़ योगा फक्त शरीरालाच नव्हे तर मनालाही स्वच्छ आणि निर्मळ बनवितो़ योगामुळे संपूर्ण स्वास्थ्य निरोगी राहते़ पतंजली योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णू भूतडा यावेळी योगासने व प्राणायाम बाबत मार्गदर्शन केले़ सुत्रसंचालन ब्रम्हकुमारी पुनियाबेन यांनी केले़ ब्रम्हकुमारी नंदाबेन यांनी आभार मानले़ क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील महिला, मुला-मुलींची संख्या लक्षणीय होती़
रविवारची सरकारी सुट्टी असताना शाळा-महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदीन साजरा करण्यात आला़ जिजामाता विद्यालयात प्राचार्य के़एऩ बिरादार यांच्या उपस्थितीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी योग उपक्रमात सहभाग नोंदविला़ ताडासन, वृक्षासन, मयुरासन, धर्नुसन, भुजंगासन, चक्रासन, शषांकासन, त्रिकोनासन, वक्रासन, शिर्षासन आदी आसनाचे प्रकार विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केले़ यावेळी बाबासाहेब सोनवणे, दिपक नावाडे, सुनिल नावाडे, शंकर दुरुगकर, सविता राठोड, शंकर पांचाळ, बालाजी साबळे, बी़एच़ बावणे आदींची उपस्थिती होती़
बंकटलाल लाहोटी विद्यालयात सकाळी ७ वाजता योगदिनानिमित्त योगासने करण्यात आली़ मुला-मुलींच्या स्वतंत्र बॅचमध्ये योगासने करण्यात आली़ यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ़ अनिल राठी, आनंद लाहोटी, सुनिल लोहिया यांनी विद्यार्थ्यांना योगा बाबत मार्गदर्शन केले़ श्री़ व्यंकटेश विद्यालयातही योगदीन साजरा करण्यात आला़ मुख्याध्यापक व्ही. ए. नागदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ शहरातील क्रीडा संकुलासह नाना-नानी पार्क व महाविद्यालयाच्या प्रांगणात योग शिबीराचे आयोजन होते़
लातूर जिल्ह्यातील ९८८ गावांत व २ हजार ५६३ शाळांमध्ये वेगवेगळ्या २६ संस्थांच्या सहकार्याने योग शिबीर घेण्यात आले आहे़ प्रत्येक गावात योग शिकविण्याची व्यवस्था केली जाणार असून, योग हा जीवनशैलीचे विज्ञान असून, आरोग्य कमविण्याचा नैसर्गिक मार्ग आहे़ त्यासाठी ९८८ गावांतील २ हजार ५६३ शाळांमध्ये योग शिबीर घेण्यात येत असल्याचे डॉ़ सुधीर बनशेळकीकर यांनी सांगितले़ दरम्यान, रविवारी ताडासन, वृक्षासन, मयुरासन, धर्नुसन, भुजंगासन, चक्रासन, शषांकासन, त्रिकोनासन, वक्रासन, शिर्षासन आदी आसनाचे प्रकार केले़
चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी राहून स्वत:च्या शरिरासाठी प्रत्येकाने दररोज एक तास देऊन योगासने केल्यास बलशाली राष्ट्र म्हणून भारताची ओळख होईल, असे मत माजी मुख्यमंत्री डॉ़ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे व्यक्त केले़ निलंगा येथील नक्षत्र मंगल कार्यालयात पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदीन साजरा करण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़
४मंचावर ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी बळीराम पाटील, अॅड़ अनंतराव सबनीस, डॉ़ एम़एनक़ुडुंबळे, पोनि औदुंबर खेडकर, प्रल्हाद बाहेती यांची उपस्थिती होती़ निलंगा शहरात महाराष्ट्र विद्यालय निलंगा, शिवाजी विद्यालय, जयभारत विद्यालय,महाराष्ट्र विद्यालय, फार्मसी कॉलेज आदी शाळा-महाविद्यालयात योगदीन साजरा करण्यात आला़ यावेळी आ़संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, पूर्वी शारीरिक कष्टाची कामे करावी लागत होती़ आता यंत्रयुगात ही कामे बंद झाली आहेत़ त्यामुळे प्रत्येकाने दररोज एक तास योगा करुन निरोगी शरीर ठेवले पाहिजे़ भौतिक सुखाच्या जगात योगासन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.