लोकमततर्फे १७ पासून योगा, प्राणायाम शिबीर

By Admin | Updated: June 14, 2016 23:56 IST2016-06-14T23:29:58+5:302016-06-14T23:56:09+5:30

औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Yoga from 17 to 17, Pranayama Camp | लोकमततर्फे १७ पासून योगा, प्राणायाम शिबीर

लोकमततर्फे १७ पासून योगा, प्राणायाम शिबीर

औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिबिरात सहभागी होणाऱ्या पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
निरोगी आरोग्यासाठी दररोज प्राणायाम, ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. अनेकांची योग, प्राणायाम करण्याची इच्छा असते पण त्यांना कुठे शिबीर चालतात याची माहित नसते. यासाठी खास लोकमतने शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर विनामूल्य असून यात योग, ध्यान व प्राणायामाबदल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरात १५ वर्षे वयोगटावरील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकणार आहे. शिबिरात येताना सोबत सतरंजी वा बेडशीट आणावे. सैलसर कपडे परिधान करून यावेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, असे शिबिराचे तत्त्व असून, इच्छुकांना शिबिराच्या पहिल्या दिवसापासून निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, लागणार आहे. योगप्रेमींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सखी मंच सदस्यांनाही संधी
योगा, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिरात लोकमत सखी मंचच्या सदस्यांनाही सहभागी होता येणार आहे. जालना रोडवरील लोकमत भवनच्या पाठीमागील हॉलमध्ये सर्वांसाठी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत शिबीर घेण्यात येईल.

Web Title: Yoga from 17 to 17, Pranayama Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.