छत्रपती संभाजीनगर : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही चोरून देशात वास्तव्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेशासाठी प्रयत्नात असलेला येमेनचा नागरिक मोहम्मद अहेमद अली बिनाशिखबुबकर (वय ३२) याला पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाने १० फेब्रुवारीला ताब्यात घेतले. त्याला भाड्याने घर देऊन पोलिसांना ही बाब लपवल्याप्रकरणी घरमालक शेख नासेर शेख अजगर अली (रा. जयसिंगपुरा) याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
येमेनचे नागरिकत्व असलेला अहमद ऑक्टोबर २०१४ मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारतात आला. त्याने बंगळुरू येथे नोंदणी करून व्हिसा मिळवून २०१७ पर्यंत तेथेच वास्तव्य केले. त्या दरम्यानच त्याच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतर तो बंगळुरू सोडून दोन वर्षे इतरत्र राहिला. काही वर्षांपूर्वी त्याने शहरातील जयसिंगपुऱ्यात २२०० रुपये भाड्याने खोली घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तो प्रयत्नात होता. यापूर्वी शहरात आलेल्या येमेन व अन्य देशांच्या तरुणांच्या तो संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद विरोधी कक्षाला त्याच्याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून त्याला ताब्यात घेण्यात आले.
अहेमदबाबत केंद्रीय तसेच राज्य गुप्तचर यंत्रणा, एटीएस अनभिज्ञ होते. विदेशी व परराज्यांतील नागरिक किरायाने वास्तव्यास असल्यास पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, घरमालक नासेरने कुठलाही करारनामा केला नाही. शिवाय, पोलिसांनाही कळविले नाही. नासेरवर पोलिस निरीक्षक राजेश मयेकर यांच्या तक्रारीवरून इमिग्रेशन ॲण्ड फॉरेन ॲक्ट, २०२५ चे कलम २३ (ब) सह कलम ४५ व २२३ बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक मारोती मदेवाड तपास करत आहेत.
Web Summary : A Yemeni national, overstaying his visa and attempting university admission, was arrested in Chhatrapati Sambhajinagar. The landlord who sheltered him without informing the police has also been booked for violating immigration laws.
Web Summary : वीज़ा अवधि समाप्त होने के बाद भी छत्रपति संभाजीनगर में अवैध रूप से रह रहे और विश्वविद्यालय में प्रवेश का प्रयास कर रहे एक येमेनी नागरिक को गिरफ्तार किया गया। पुलिस को सूचित किए बिना उसे आश्रय देने वाले मकान मालिक पर भी मामला दर्ज किया गया है।