यंदाचा ‘रोटरी जालना एक्स्पो’ ठरणार युवकांचे आकर्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:19 IST2017-11-05T01:18:44+5:302017-11-05T01:19:25+5:30
यंदाचा रोटरी जालना एक्स्पो हा युवक आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास उद्योजक अकलंक (बंडूभाऊ) मिश्रीकोटकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

यंदाचा ‘रोटरी जालना एक्स्पो’ ठरणार युवकांचे आकर्षण!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदाचा रोटरी जालना एक्स्पो हा युवक आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास उद्योजक अकलंक (बंडूभाऊ) मिश्रीकोटकर यांनी शनिवारी व्यक्त केला.
एक्स्पोच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे असलेले हेमंत ठक्कर, बंडूभाऊ मिश्रीकोटकर, सुनील रायठठ्ठा, भावेश पटेल, दीपक बगडिया यांनी शनिवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी १५ ते १७ डिसेंबरदरम्यान भरविण्यात येणाºया एक्स्पोच्या आयोजनामागील उद्देश सांगून यंदा ग्रामीण भागातील युवक व तरुणांना या एक्स्पोमध्ये आणून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे मिश्रीकोटकर म्हणाले. दर पाच वर्षांनी रोटरी जालनातर्फे एक्स्पो भरविण्यात येतो. यंदा मंठा चौफुलीजवळील कलश सीड्सच्या प्रांगणात होत आहे. ९ एकरमध्ये होणाºया या एक्स्पोची विविध वैशिष्ट्ये असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही व इतर उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध राहतील. शहरातील विविध शाळांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून ८० हजार विद्यार्थी या एक्स्पोला भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक्स्पोमध्ये असे असेल नियोजन
एक्स्पोमध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी २४० स्टॉल लावण्यात येतील.
तसेच लघु उद्योग आणि कृषीवर आधारित उद्योगांसाठी स्टॉल असतील. जेएनपीटी आणि आयसीटी यांचेही स्टॉल असणार आहेत. याद्वारे ड्रायपोर्ट व आयसीटीची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.