शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबरमध्ये

By admin | Updated: September 8, 2014 00:34 IST

औरंगाबाद : यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.

औरंगाबाद : यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यापीठाला हा निर्णय घ्यावा लागला.यासंदर्भात विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे यांनी सांगितले की, यंदाही विद्यापीठ परिसरातच केंद्रीय युवक महोत्सव घेतला जाईल. त्यादृष्टीने सर्व संलग्नित महाविद्यालयांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या युवक महोत्सवात आपले संघ पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते. त्यामुळे युवक महोत्सव नेमक्या कोणत्या तारखेला घ्यायचा, त्याबाबत विद्यापीठाला निश्चित निर्णय घेण्यास अडचण येत आहे. आचारसंहितेची तारीख जाहीर झाल्यास युवक महोत्सवाची तारीख निश्चित केली जाईल. गेल्या वर्षी केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठ परिसरातच घेण्यात आला होता. या महोत्सवासंदर्भात अलीकडेच सल्लागार समितीची बैठक व कार्यशाळाही घेण्यात आली. केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. जे महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होणार नाही, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिलाच महोत्सव होणार आहे, हे विशेष!