यंदा फटाक्यांबरोबरच ‘रॉक संगीता’ची आतषबाजी

By Admin | Updated: October 27, 2016 00:42 IST2016-10-27T00:42:59+5:302016-10-27T00:42:59+5:30

औरंगाबाद : दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी यंदा द्विगुणित होणार. यंदाची दिवाळी एकदम ‘रॉकिंग’ असेल. पासेस घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याची ही प्रतिक्रिया शहरात

This year, rock fireworks' fireworks and fireworks | यंदा फटाक्यांबरोबरच ‘रॉक संगीता’ची आतषबाजी

यंदा फटाक्यांबरोबरच ‘रॉक संगीता’ची आतषबाजी


औरंगाबाद : दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी यंदा द्विगुणित होणार. यंदाची दिवाळी एकदम ‘रॉकिंग’ असेल. पासेस घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याची ही प्रतिक्रिया शहरात होणाऱ्या ‘लोकमत रॉक आॅन २’ कॉन्सर्टबद्दलचा उत्साह स्पष्ट दर्शवते. पास मिळविण्यासाठी केलेली धडपड आणि तो मिळवल्यानंतरचा आनंद तुम्हाला काय सांगू अशा शब्दांत उमटणाऱ्या प्रतिक्रियाच सर्व काही सांगून जातात.
‘टाटा टी गोल्ड’ प्रस्तुत ‘लोकमत रॉक आॅन २ - लाईव्ह इन कॉन्सर्ट’ पॉवर्ड बाय ‘एम. के. कन्स्ट्रक्शन्स’ व ‘ई-राईडस्’ येत्या २ नोव्हेंबर रोजी बीड बायपास रोडवरील जबिंदा इस्टेट येथे सायं. ६ होणार आहे. लोकमत भवनचे रिगल लॉन, प्रोझोन मॉल आणि शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये पासेस केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. कोहिनूर अहमदनगर हे कॉन्सर्टचे सहप्रायोजक असून मॉल पार्टनर प्रोझोन, आऊटडोअर पार्टनर ड्रीम्स क्रिएशन आणि रेडिओ पार्टनर रेडिओ मिर्ची आहे.
सोशल मीडिया पे हिट
क ॉन्सर्टच्या फेसबुक पेजवर तर लोकांचा प्रतिसाद थक्क करून टाकणारा आहे. युवकांच्या दृष्टीने ‘लोकमत’चा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून यापुढेही असे कार्यक्रम झाले पाहिजे अशा आशयाचे मेसेज तरुण पाठवत असल्याचे ‘सेव्हन हायवे’चे सहसंस्थापक निखिल भालेराव यांनी सांगितले. त्यांनी कॉन्सर्टचे फेसबुक पेज बनवले आहे. ँ३३स्र२://६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ी५ील्ल३२/310761539296766/ या लिंकवर जाऊन तुम्ही हे पेज लाईक करू शकता.
टाटा टी गोल्ड पासेस
पुढील केंद्रावर २५० ग्रॅम टाटा टी गोल्ड मिक्स्चरचे पाकीट विकत घेतल्यास दोन पासेस व एक प्लास्टिक जार मोफत मिळेल. टाटा टी गोल्ड मिक्स्चरच्या रिकाम्या पाकिटाच्या बदल्यातही दोन पासेस तुम्ही घेऊन जाऊ शकता. ही आॅफर मिलन मिठाई (मछली खडक, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस), आकर्र्षण बुटिक (समर्थनगर), सुंदर टी कंपनी (जाधव मंडी, संस्थान गणपतीजवळ), नूतन अडसारे (आर. जयभवानी चौक, बजाजनगर), पैठण आर्ट गॅलरी (उल्कानगरी), किडस् किंग्डम स्कूल (सिंधी कॉलनी) इ. केंद्रांवर उपलब्ध आहे.

Web Title: This year, rock fireworks' fireworks and fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.