यंदा ‘एम.फिल.’च्या सव्वाशे जागा घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:33+5:302020-12-17T04:32:33+5:30

दुसरीकडे, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल. हा अभ्यासक्रम बंद केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात ...

This year, M.Phil | यंदा ‘एम.फिल.’च्या सव्वाशे जागा घटल्या

यंदा ‘एम.फिल.’च्या सव्वाशे जागा घटल्या

दुसरीकडे, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल. हा अभ्यासक्रम बंद केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नवीन शैक्षणिक धोरण सन २०२२ पासून अमलात येणार आहे, तोपर्यंत विद्यापीठात एम.फिल. अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी विद्यापीठातील विविध विभागांकडून या अभ्यासक्रमासाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल, याचा आढावा घेतला. त्यानुसार एम.फिल.साठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी गुणवत्तेनुसार एकूण १८ विभागांमध्ये २३० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध करीत पूर्वीप्रमाणे सरसकट प्रतिविभाग २० विद्यार्थी या प्रमाणे एम.फिल.साठी प्रवेश द्यावा, अशी मागणी केली आहे.

चौकट...

यंदा ‘एम.फिल.’च्या प्रवेशाची स्थिती अशी

मराठी- १०, हिंदी-२०, इंग्रजी- २०, इतिहास- ८, अर्थशास्त्र- १५, समाजशास्त्र- २०, राज्यशास्त्र- १२, लोकप्रशासन- २०, गणित- ९, कॉमर्स- १०, पाली-बुद्धिझम- ८, उर्दू- २०, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र- १३, संगणकशास्त्र- २०, शारीरिक शिक्षण- ४, शिक्षणशास्त्र- ८, वृत्तपत्र अभ्यास- २ आणि व्यवस्थापनशास्त्र- ११.

Web Title: This year, M.Phil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.