वर्षभरापासून शिक्षकांची चटोपाध्याय वेतनश्रेणी रखडली
By Admin | Updated: July 31, 2014 00:48 IST2014-07-30T23:53:46+5:302014-07-31T00:48:47+5:30
नांदेड : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़

वर्षभरापासून शिक्षकांची चटोपाध्याय वेतनश्रेणी रखडली
नांदेड : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़ वर्षभरापासून हा प्रश्न रखडला आहे़
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना १२ वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नतीऐवजी पदोन्नतीची चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यात येते़ या वेतनश्रेणीसाठी जिल्ह्यातील ४०० हून अधिक शिक्षक पात्र आहेत़ यातील बहुतांश शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीबाबतचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत़ परंतु याबाबत गेल्या वर्षभरापासून प्रशासनाने आदेश निर्गमित केले नाहीत़ याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देवीदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रा़शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी, चटोपाध्याय समितीचे सचिव तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी बालाजी पुंडगीर यांची भेट घेवून वेतनश्रेणी तसेच सर्व प्रकारच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्याची मागणी केली़ हे आदेश निर्गमित झाल्यास जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांना लाभ मिळणार असल्याचे संघटनेचे महासचिव चंद्रकांत मेकाले यांनी सांगितले़ संघटनेच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष विठ्ठल ताकबिडे, प्रल्हाद राठोड, अशोक पाटील, गंगाधर मावले, उमाकांत मैलारे, व्हीक़े़ कागडे, उत्तम बागल आदींचा समावेश होता़ जिल्ह्यात पदोन्नतीने भरावयाची प्राथमिक पदवीधर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत़ (प्रतिनिधी)