कळमनुरीच्या नगराध्यक्षपदी यासमीन बेगम
By Admin | Updated: July 16, 2014 00:50 IST2014-07-16T00:31:40+5:302014-07-16T00:50:44+5:30
कळमनुरी : येथील न.प.च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या यासमीन बेगम फारुक बागवान तर उपनगराध्यक्षपदी राकाँचे म. नाजीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कळमनुरीच्या नगराध्यक्षपदी यासमीन बेगम
उस्मानाबाद : शारीरिक, मानसिक जाच करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासूस चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा उस्मानाबाद येथील तदर्थ अतिरिक्त सत्र न्यायाधीश के़एस़होरे यांनी सुनावली़ विवाहितेने उमरगा चिवरी येथे १० आॅगस्ट २०१० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उळेगाव (ता़दक्षिण सोलापूर) येथील दत्तात्रय रामचंद्र घाटे यांची बहीण अनिता हिचा उमरगा चिवरी (ता़तुळजापूर) येथील महेश बबु्रवान कोळी याच्याशी २००८ मध्ये विवाह झाला होता़ विवाहानंतर अनिता हिचा पती महेश कोळी व सासू वत्सलाबाई कोळी हे तूला स्वयंपाक येत नाही, कर्ज फेडण्यासाठी वडिलांकडून ३० हजार रूपये घेऊन ये म्हणून शारीरिक, मानसिक जाच करीत होते़ याबाबत २०१० मध्ये महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार कण्यात आली होती़ त्यानंतर तिस नांदविण्यास नेण्यात आले होते़ मात्र, तरीही तिचा जाच सुरू होता़ या जाचास कंटाळून अनिता हिने १० आॅगस्ट २०१२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत दत्तात्रय घाटे यांच्या फिर्यादीवरून अनिताच्या पतीसह सासूविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुरनं १३४/ १२ भादंवि कलम ४९८ अ, ३०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ सहाय्यक पोलिस निरीक्षक एस़एस़शेटकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के़एस़होरे यांच्यासमोर सुनावणी झाली़ न्यायालयासमोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून पती महेश कोळी व सासू वत्सलाबाई कोळी यांना कलम ४९८ अ सह ३४ भादंवि प्रमाणे दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रूपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी, कमल ३०६ सह ३४ भादंवि अन्वये ४ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रूपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याचे अॅड़जाधव यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)
प्रत्येकी दोन हजार रूपये दंडही.
१० आॅगस्ट २०१० मध्ये विवाहितेने गळफास घेऊन केली होती आत्महत्या.
नळदुर्ग पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल.