यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठातर्फे मोईन मस्तान ग्रुपचा काेविड योद्धा म्हणून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:04 IST2021-07-01T04:04:52+5:302021-07-01T04:04:52+5:30

जवाहर कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात हा सोहळा कोविड नियम पाळून संपन्न झाला. यावेळी केंद्राचे कोषाध्यक्ष ...

Yashwantrao Chavan honors Moin Mastan Group as Kavid Warrior | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठातर्फे मोईन मस्तान ग्रुपचा काेविड योद्धा म्हणून गौरव

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठातर्फे मोईन मस्तान ग्रुपचा काेविड योद्धा म्हणून गौरव

जवाहर कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात हा सोहळा कोविड नियम पाळून संपन्न झाला. यावेळी केंद्राचे कोषाध्यक्ष सचिन मुळे यांच्या हस्ते सदस्यांना सन्मानित करण्यात आले. मोईन मस्तान ग्रुपच्या सदस्यांनी मृत व्यक्तीची जात, पात, धर्म, पंथ, भाषा न बघता मनोभावे अंत्यविधी केले. औरंगाबादच्या सर्व रुग्णालयांमध्ये ते अविरत सेवा प्रदान करीत होते. यावेळी केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी प्रास्ताविक केले. दिग्दर्शक डॉ. शिव कदम, के.के. जाधव यांची उपस्थिती होती. संचलन महेश अचिंतलवार यांनी केले, तर आभार सुबोध जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश निरंतर, दीपक जाधव, ज्ञानेश बोद्रे, प्रतीक राऊत, अक्षय गोरे, रायभान शिसोदे, प्रदीप धाडगे, ज्ञानेश्वर वडकर आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबादतर्फे कोरोनाच्या काळात शेकडो मृत रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या मोईन मस्तान ग्रुपच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आले.

Web Title: Yashwantrao Chavan honors Moin Mastan Group as Kavid Warrior