जलतरण स्पर्धेत यशवंत, विधी महाविद्यालयाला विजेतेपद
By Admin | Updated: September 3, 2014 00:30 IST2014-09-03T00:29:27+5:302014-09-03T00:30:13+5:30
नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सर्वाधिक गुण मिळवून जलतरण स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

जलतरण स्पर्धेत यशवंत, विधी महाविद्यालयाला विजेतेपद
नांदेड : स्वारातीम विद्यापीठ व सहयोग बी.एड. महाविद्यालय यांच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मनपा जलतरणिकेत पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत मुलांच्या गटात यशवंत महाविद्यालय व मुलींच्या गटात नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सर्वाधिक गुण मिळवून जलतरण स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयाच्या जलतरण पट्टूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पंच म्हणून डॉ. शेजूळ, डॉ. पंडित, डॉ. गणाचार्य, डॉ. सोळंके, डॉ. मोघे, डॉ. सातपुते, डॉ. जाधव, रमेश चौरे, डॉ. महाजन, प्रा. कदम, डॉ. लोकरे, मुजीब हसन आदींनी सहकार्य केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्राचार्य डॉ. इनामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. कुलकर्णी, प्रा.डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांची उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)