शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

यशश्री मुंडेंचीही राजकारणात ‘एन्ट्री’ !

By admin | Updated: March 30, 2015 00:43 IST

परळी : तालुक्याच्या राजकारणावर शेवटपर्यंत मजबूत पकड ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सत्तास्थाने अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर येऊन ठेपले होते

परळी : तालुक्याच्या राजकारणावर शेवटपर्यंत मजबूत पकड ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सत्तास्थाने अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर येऊन ठेपले होते. डॉ. प्रीतम खाडे यांना अनपेक्षितपणे राजकारणात उतरावे लागले. वैद्यनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने स्व. मुंडे यांच्या धाकट्या कन्या अ‍ॅड. यशश्री मुंडे यांचीही राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे.२१ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात आहेत. स्थापनेपासून कारखान्यावर गोपीनाथराव मुंडे यांचा रुबाब होता. मात्र आता कारखान्याची सत्ता खेचून घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे. जेष्ठ संचालक व धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे यांनीही जोर लावला आहे. त्यामुळे पंकजाविरूद्ध धनंजय अशी थेट लढत पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे, पंडितराव मुंडे हे पिता-पुत्र एकीकडून तर पंकजा मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे या भगिनी दुसरीकडून झुंज देत आहेत. अस्तित्व, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा या निमित्ताने कस लागत आहे.पंकजा यांच्याकडे राजकारणाचा अनुभव आहे. मात्र, अ‍ॅड. यशश्री मुंडे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. वकिलीचे शिक्षण घेऊन बॅरिस्टर होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या यशश्री यांना वडिलांच्या निधनानंतर अचानक राजकारणात यावे लागले आहे. विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीवेळी त्या प्रचारात सक्रिय होत्या.वैद्यनाथ कारखान्याचा कारभार मागील काही दिवसांपासून यशश्री याच पाहत आहेत. त्यामुळे त्यांचा गृहपाठ झाला आहे. मोठ्या भगिनी पंकजा यांच्यासाठी त्या धावल्या आहेत. राजकारणाच्या डावपेचात विरोधकांना त्या कशा सामोरे जातात? यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. (वार्ताहर)विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. हे आव्हान पेलवताना त्यांच्या मदतीला अ‍ॅड. यशश्री मुंडे धावल्या होत्या.४मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेटीगाठी घेऊन त्यांनी प्रचार केला होता.४गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी मोठ्या खुबीने मतदारांपुढे ठेवला होता.४गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर कारखान्याची धुरा यशश्री यांच्याकडे होती.४पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.