युवकांनी फोडल्या भरधाव ट्रकच्या काचा
By Admin | Updated: September 17, 2014 00:20 IST2014-09-17T00:09:45+5:302014-09-17T00:20:56+5:30
परभणी: परभणी-वसमत रस्त्यावर विद्यापीठ कमानीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या काचा युवकांनी फोडल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

युवकांनी फोडल्या भरधाव ट्रकच्या काचा
परभणी: परभणी-वसमत रस्त्यावर विद्यापीठ कमानीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या काचा युवकांनी फोडल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परभणी येथून ट्रक क्रमांक एम.एच.२६-एच.८८४९ हा नांदेडकडे जात होता. वसमतरोडवरील विद्यापीठ कमानीजवळ ट्रकचालक भरधाव वेगाने वाहन चालवित होता. त्यामुळे या परिसरातील युवकांनी हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहनचालकाने ट्रक न थांबविल्याने काही युवकांनी त्यावर दगडफेक केली. त्यामुळे या ट्रकच्या काचा फुटल्या. ट्रकचालकाने ट्रक सोडून पोबारा केला. त्यानंतर नवा मोंढा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले. या ठिकाणी नागरिकांची बघ्याची गर्दी झाली होती.(प्रतिनिधी)