चुकीच्या औषधोपचाराने बैल दगावला

By Admin | Updated: July 12, 2014 00:41 IST2014-07-12T00:41:43+5:302014-07-12T00:41:43+5:30

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलेल्या बैलावर चुकीचे औषधोपचार झाल्याने सदरील जनावर दगावल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी घडली.

Wrong medication gets bullied | चुकीच्या औषधोपचाराने बैल दगावला

चुकीच्या औषधोपचाराने बैल दगावला

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलेल्या बैलावर चुकीचे औषधोपचार झाल्याने सदरील जनावर दगावल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी घडली. कर्तव्यावर गैरहजर असलेल्या प्रभारी पशुधन विकास अधिकाऱ्याने दिलेल्या सल्ल्यानुसार दवाखान्यातील परिचराने हे उपचार केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.
गोरेगाव येथील शेतकरी पांडुरंग वामनराव कावरखे यांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या आजारी बैलास उपचारासाठी गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी गुरांचे डॉक्टर हजर नसल्याने परिचर सय्यद अल्लाऊद्दीन यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही.एल. गिरी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार सुरू केले.या उपचारादरम्यान सदरील बैल दगावल्याने पांडुरंग कावरखे यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबत कावरखे यांनी पशुधन अधिकारी गिरी प्रत्यक्ष हजर नसताना परिचरने केलेल्या चुकीच्या औषधोपचारामुळे बैल दगावल्याची तक्रार गोरेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
त्यावरून जमादार टी.एस. गुव्हाडे यांनी पंचनामा केला. तसेच बैलाच्या विच्छेदन अहवालानंतर चौकशी करून या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Wrong medication gets bullied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.