लेखणीबंदमुळे कामे खोळंबली

By Admin | Updated: April 13, 2016 00:29 IST2016-04-13T00:29:01+5:302016-04-13T00:29:01+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १२) लेखणी बंद आंदोलन केले.

Writing works out to work | लेखणीबंदमुळे कामे खोळंबली

लेखणीबंदमुळे कामे खोळंबली


औरंगाबाद : जिल्ह्यात तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १२) लेखणी बंद आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका तहसील कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना बसला.
तहसीलदारांना निवेदन
फुलंब्री : येथील तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन केले़ मागण्या त्वरित पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले़ कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांविषयी २२ मार्चला काळ्या फिती लाऊन आंदोलन केले होते़ यावेळी नायब तहसीलदारांच्या पे ग्रेडमध्ये वाढ करावी, लिपिकपदाला महसूल सहायकाचा दर्जा देण्यात यावा, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या करण्यात आल्या़ या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी़ आऱ कदम, नामदेव सोनवणे, डी़ जे़ शिंदे, सुभाष पांढरे, बी़ बी़ सोनवणे, वनिता वाघ, मंजूश्री तोतरे, किशोर घुगे, सुनील विश्वासू, संतोष राऊत, नंदकुमार देवकर, रामदास जाधव आदींनी सहभाग घेतला़ फुलंब्रीत मंगळवारी आठवडी बाजार असल्याने तालुकाभरातून लोक तहसील कार्यालयात विविध कामांसाठी आले होते; मात्र कामबंद असल्याने त्यांना परत जावे लागले़
नागरिकांची गैरसोय
सोयगाव : महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोयगाव येथे मंगळवारी (दि़१२) लेखणीबंद आंदोलन करण्यात आले़
सोयगावात मंगळवारी आठवडी बाजार असतो़ नागरिक कामांसाठी तहसील कार्यालयात येतात; मात्र कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लेखणीबंद आंदोलनामुळे नागरिकांना रिकाम्या हातानेचे परतावे लागले़ येथील महसूल कर्मचारी संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी तथा सोयगाव तहसीलच्या अपर तहसीलदार गौरी सावंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ या आंदोलनात एन.आर. उखळकर, विजय येवले, स.अब्दुल हलीम, आर.एस. परदेशी, एस.एस. जोशी, एस.एन. शेख, एच.एच. राऊत, आर.डी. जाधव, विकास तुपारे, डी.एफ. सोनवणे, एच.के. हरणे, यु.डी. वामणे, एम.आर. पटेल, ए.बी.मरकड, लक्ष्मण इंगळे, शिवाजी शेरे, सविता सोनवणे, मनोज आगे, संभाजी बोरसे, समाधान गोराडे, संजय साठे आदींनी सहभाग घेतला़
कन्नड येथेही लेखणीबंद
कन्नड : तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जी.ई.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांना निवेदन देण्यात आले. पी.के.दांडगे, एम.जे.बेग, एस.आर.आव्हाड, व्ही.एम.काटकर यांच्यासह अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Writing works out to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.