अंध- दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळेना 'रायटर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:04 IST2021-04-13T04:04:46+5:302021-04-13T04:04:46+5:30
एक- दोन दिवसांचा प्रश्न असता तर कदाचित लेखनिक मिळण्याचे काम सोपे झाले असते; परंतु १० वी, १२ वीच्या परीक्षा ...

अंध- दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळेना 'रायटर'
एक- दोन दिवसांचा प्रश्न असता तर कदाचित लेखनिक मिळण्याचे काम सोपे झाले असते; परंतु १० वी, १२ वीच्या परीक्षा दीर्घ काळ चालतात. याशिवाय परीक्षा कधी होणार, याची काहीच शाश्वती नाही. दर दिवशी परीक्षेबाबत नवाच निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे अशा सगळ्याच संभ्रमाच्या वातावरणात आणि कोरोनाच्या संकटात रायटर मिळणे कठीण झाले आहे.
चौकट :
ऑनलाइन परीक्षांमुळे अडचणी कमी
विद्यापीठाच्या परीक्षांदरम्यानही रायटर शोधण्यास अडचणी आल्या; परंतु त्या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून झाल्यामुळे रायटर शोधणे तुलनेने सोपे झाले होते, असे काही अंध- दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी सांगितले.
चौकट :
लेखनिक म्हणून यायला तयार नाही
लेखनिक शोधण्यासाठी कोरोना महामारीमुळे यावर्षी खूपच जास्त अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी शहर सोडून त्यांच्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे शोधाशोध करावी लागत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बहुतांश विद्यार्थी लेखनिक म्हणून यायला तयार नाहीत. तयार झाले तरी सगळ्या पेपरसाठी येतीलच, याची काहीच शाश्वती नाही. त्यातच एसएससी बोर्डाने लेखनिकांकडून हमीपत्र भरून घ्या, असे सांगितले आहे. हे अनेकांना जाचक वाटत असून, त्यामुळेही विद्यार्थ्यांना रायटर म्हणून येण्याची धास्ती वाटत आहे. परीक्षांच्या तारखाही निश्चित नाहीत आणि लॉकडाऊनबाबतही सगळीच साशंकता आहे. त्याचाही परिणाम लेखनिक मिळण्यावर होत आहे.
- ज्ञानेश्वर वरकड,
व्यवस्थापकीय अधीक्षक, रंगलालजी बाहेती अंध मुलींची शाळा.