शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जखमी तरूणाचा मृत्यू

By admin | Updated: August 13, 2015 00:20 IST

जालना\सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे मंगळवारी रात्री झालेल्या हल्यात वृद्ध मृत्यू झाला होता, तर तरुण गंभीर जखमी झाला होता.

जालना\सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे मंगळवारी रात्री झालेल्या हल्यात वृद्ध मृत्यू झाला होता, तर तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना या तरुणाचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. या प्रकरणी घटनेची माहिती देणाराच आरोपी निघाला असून, त्यास अटक करून सेवली पोलिसांनी मंठा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती स.पो. नि. पी.एस.सपकाळे यांनी दिली. सेवली येथे संतोष बाबूराव खंदारे याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देवून दुसरे लग्न केले होते. मात्र, दुसरी पत्नीही राहत नसल्याने तो पहिल्या पत्नीकडे परत नांदण्यास यावे म्हणून चकरा मारीत होता. ही बाब त्याचा साडू मयत प्रकाश बागडू खंदारे (२५ रा. सेवली) व मामे सासरे संतोबा मुंजाजी आघाम (६५ रा.भागडे सावरगाव ) यांना आवडत नसे. मंगळवारी आठवडी बाजारासाठी आघाम आले होते. त्याचवेळी प्रकाश खंदारे भेटल्याने संतोषने दोघांना घरी नेले. तेथे दारूच्या नशेत प्रकाश व संतोबा यांच्याशी वाद झाला. त्यातूनच संतोषने प्रकाशवर चाकूने हल्ला केला. त्याच वेळी संतोबा मध्यस्थीसाठी आल्याने त्यांच्याही पोटात चाकू भोसकला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पोलिस ठाण्यात हजर होत आपल्या घराजवळ दोघांचे भाडंण सुरू असल्याचा बनाव करून संतोषने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीनंतर हे कृत्य त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. (प्रतिनिधी)घटस्फोट घेतलेल्या पत्नीला पुन्हा नांदविण्यासाठी पाठवावे म्हणून संतोषने हे कृत्य केले. यातील मयत हे त्याचे नातेवाईक आहेत. त्यात संतोबा आघाम हे मामे सासरे तर प्रकाश खंदारे हे साडू होते. संतोष नेहमी फारकत झालेल्या पत्नीकडे येत असे, त्याला संतोबा व प्रकाशचा विरोध असल्याने याच मुद्दावर त्यांचा वाद झाला. त्यातून त्याने दोघांचाही खून केल्याचे प्रथम दर्शनी तपासात समोर आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. सपकाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.