जखमी तरूणाचा मृत्यू

By Admin | Updated: August 13, 2015 00:20 IST2015-08-13T00:01:17+5:302015-08-13T00:20:09+5:30

जालना\सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे मंगळवारी रात्री झालेल्या हल्यात वृद्ध मृत्यू झाला होता, तर तरुण गंभीर जखमी झाला होता.

Wounded maternal death | जखमी तरूणाचा मृत्यू

जखमी तरूणाचा मृत्यू


जालना\सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे मंगळवारी रात्री झालेल्या हल्यात वृद्ध मृत्यू झाला होता, तर तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना या तरुणाचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.
या प्रकरणी घटनेची माहिती देणाराच आरोपी निघाला असून, त्यास अटक करून सेवली पोलिसांनी मंठा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती स.पो. नि. पी.एस.सपकाळे यांनी दिली. सेवली येथे संतोष बाबूराव खंदारे याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देवून दुसरे लग्न केले होते. मात्र, दुसरी पत्नीही राहत नसल्याने तो पहिल्या पत्नीकडे परत नांदण्यास यावे म्हणून चकरा मारीत होता. ही बाब त्याचा साडू मयत प्रकाश बागडू खंदारे (२५ रा. सेवली) व मामे सासरे संतोबा मुंजाजी आघाम (६५ रा.भागडे सावरगाव ) यांना आवडत नसे. मंगळवारी आठवडी बाजारासाठी आघाम आले होते. त्याचवेळी प्रकाश खंदारे भेटल्याने संतोषने दोघांना घरी नेले. तेथे दारूच्या नशेत प्रकाश व संतोबा यांच्याशी वाद झाला. त्यातूनच संतोषने प्रकाशवर चाकूने हल्ला केला. त्याच वेळी संतोबा मध्यस्थीसाठी आल्याने त्यांच्याही पोटात चाकू भोसकला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पोलिस ठाण्यात हजर होत आपल्या घराजवळ दोघांचे भाडंण सुरू असल्याचा बनाव करून संतोषने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीनंतर हे कृत्य त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. (प्रतिनिधी)
घटस्फोट घेतलेल्या पत्नीला पुन्हा नांदविण्यासाठी पाठवावे म्हणून संतोषने हे कृत्य केले. यातील मयत हे त्याचे नातेवाईक आहेत. त्यात संतोबा आघाम हे मामे सासरे तर प्रकाश खंदारे हे साडू होते. संतोष नेहमी फारकत झालेल्या पत्नीकडे येत असे, त्याला संतोबा व प्रकाशचा विरोध असल्याने याच मुद्दावर त्यांचा वाद झाला. त्यातून त्याने दोघांचाही खून केल्याचे
प्रथम दर्शनी तपासात समोर आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. सपकाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Wounded maternal death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.