चिंता ! ग्रामीण भागाचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 06:59 PM2021-06-17T18:59:13+5:302021-06-17T19:00:44+5:30

वैद्यकीय अहवालाच्या आधारे ११ जून ते १४ जून दरम्यान शहर क्षेत्रात रुग्णांची पॉझिटीव्हीटी टक्केवारी ०.४५ टक्के व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी ४.२७ टक्के आहे.

Worry! In Aurangabad Rural area corona positivity rate did not decrease | चिंता ! ग्रामीण भागाचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होईना

चिंता ! ग्रामीण भागाचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होईना

googlenewsNext
ठळक मुद्देचाचणी न करता दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाईस्तर तीनवरून एकपर्यंत जाण्यास यंत्रणेला परिश्रम घ्यावे लागणार

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर कमी होत नसल्यामुळे स्तर तीनवरून एकपर्यंत जाण्यास यंत्रणेला परिश्रम घ्यावे लागणार आहेत. स्तर उंचावत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लॉकडाऊन सध्या ‘जैसे थे’ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रियपणे राबविण्याच्या सूचना बुधवारी एका बैठकीत दिल्या.

ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण कमी करून शहराप्रमाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागही स्तर एकमध्ये आणण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. गावामध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, धार्मिक विधी करणाऱ्यांसह सर्वांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवावे. जेणेकरून ग्रामीणचा बाधित दर कमी होण्यास मदत होईल. ब्रेक दी चेन अंतर्गत सध्या शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांव्यतिरिक्त सर्व बाबी खुल्या केल्या आहेत.

यापुढे १०० टक्के चाचणी करणाऱ्या व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांचा गौरव करावा. लस घेतलेल्यांना चाचण्यांमधून सूट द्यावी. लस घेतलेल्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची चाचणी करणे बंधनकारक आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भाग स्तर तीनमधून स्तर एकमध्ये आणता येईल. या उद्देशाने सर्व यंत्रणांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केेले.

जिल्ह्यात १०.८० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण
वैद्यकीय अहवालाच्या आधारे ११ जून ते १४ जून दरम्यान शहर क्षेत्रात रुग्णांची पॉझिटीव्हीटी टक्केवारी ०.४५ टक्के व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी ४.२७ टक्के आहे. कोरोना रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड १०.८० टक्के आहेत.

रविवारपर्यंत चाचणीसाठी डेडलाईन
व्यापारी मालक, कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी, विनाचाचणी कोणत्याही दुकानदाराला, व्यापाऱ्याला व्यवसाय, विक्री करता येणार नाही. यासाठी सर्व संबंधितांनी येत्या रविवारच्या आत चाचण्या करणे बंधनकारक आहे. विना चाचण्या दुकान उघडणाऱ्यांवर स्थानिक यंत्रणांनी तातडीने कारवाई करून दुकान सील करावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Worry! In Aurangabad Rural area corona positivity rate did not decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.