शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

कृषिपंपचालकांची व्यथा : दर तीन महिन्याला बिले मिळेनात, हजारोंची बिले एकदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:47 IST

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देबिल न देताच महावितरणकडून केली जाते वसुली

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात जिल्ह्यातील २ लाख २७ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून, या ग्राहकांना दर तीन महिन्याला बिले दिली जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे; परंतु कृषिपंप ग्राहकांना वर्षानुवर्षे वीजबिलेच मिळत नाहीत. तसेच बिल जेव्हा येते, त्यावेळी हाती पैसे नसतात. त्यामुळे थकबाकी वाढत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये नवीन कृषिपंप वीज धोरण जाहीर झाले. या धोरणात थकबाकी भरण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर औरंगाबाद परिमंडळात १ मार्चपर्यंत ४२ हजार २६३ शेतकऱ्यांनी २१ कोटी ९५ लाखांचा भरणा केला आहे. यासंदर्भात शेतकरी लक्ष्मण चंदेल (शिल्लेगाव) म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वी पाऊस नव्हता. त्यामुळे विहिरीला पाणी नव्हते, तरीही वीजबिल आले. सचिन वाल्मीकराव शेलार (शहाजतपूर) म्हणाले, कोरोना काळात शेतकरी हातघाईस आले असून, वीजबिल माफ केले पाहिजे. विजेचा वापर कमी होत असताना बिले मात्र जास्तीची येत आहेत, ही मोठी अडचण आहे.

तालुकानिहाय कृषिपंपचालकऔरंगाबाद - २८,८०७गंगापूर - २७,९०६कन्नड - ३१,४९१खुलताबाद - ११,३०६पैठण - ३१,४४६फुलंब्री - १९,१७१सिल्लोड - २७,७४०सोयगाव - ९,३०७वैजापूर - ३९,९४९जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २,२७,१२३वीजबिल थकबाकी - २,६७२ कोटी

कृषिपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल दिले जाते. शिवाय मोबाईवरही बिल कळवले जाते. ज्यांनी मोबाईल नंबरची नोंदणी केली नसेल, त्यांना माहिती मिळत नसेल. नियमितपणे वीजबिलाचे वितरण केले जाते.- संजय अकोडे, अधीक्षक अभियंता, (ग्रामीण) महावितरण

मी चार वर्षांपूर्वी कृषी संजीवनी योजनेत जुने थकीत बिल भरले व बेबाकी करून विहिरीवर विद्युत मीटर बसवला; परंतु चार वर्षांत एकदाही मीटर रिडींग न घेता, मला ६३ हजारांचे बिल देण्यात आले. विशेष म्हणजे, माझ्या मीटरमध्ये आज रोजी ९ हजार ७४१ युनिट असताना ३६ हजार ५३० युनिटचे बिल पाठवले आहे.- एस. लक्ष्मण, लाडसावंगी

महावितरण कंपनी तीन ते चार वर्षांत एकदा वसुलीसाठी येते. ज्याचे लाख-दोन लाख बिल थकले, त्याच्याकडून पाच हजार रुपये व ज्याचे दहा ते वीस हजारांचे बिल थकले, त्याच्याकडूनही पाच हजार रुपयेच वसूल केले जातात.- राजेंद्र डवणे, सय्यदपूर

ज्यावेळेस पैसे असतात, त्यावेळी बिल येत नाही. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, त्यावेळी वीजबिल येते. विजेसंदर्भात असलेल्या अडचणीही सोडवल्या जात नाहीत. महावितरणने वाढीव बिलाची समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.- रामेश्वर निघोटे, हडस पिंपळगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण