कर्करोगाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

By Admin | Updated: January 1, 2017 23:56 IST2017-01-01T23:54:07+5:302017-01-01T23:56:22+5:30

जालना : कर्करोगाला कंटाळून वृद्धाने नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

Worried about cancer of the elderly | कर्करोगाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

कर्करोगाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

जालना : कर्करोगाला कंटाळून वृद्धाने नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मंठा रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली घडली. राधेश्याम विठ्ठलदास मालपाणी (६२) असे या व्यक्तीचे नाव आहे.
अनेक वर्षापासून मालपाणी कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. महागडे उपचार करूनही आजार बरा होत नसल्याने कंटाळून त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रेल्वेस्थानकातील पोलीस चौकीत अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Worried about cancer of the elderly