जगभरात हातांचे वाटप...
By Admin | Updated: February 15, 2016 00:15 IST2016-02-14T23:59:25+5:302016-02-15T00:15:13+5:30
लातूर : रोटरी, अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अपंगांना अत्याधुनिक कृत्रिम हातांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या शिबिरात पाचशे अपंगांनी नोंदणी केली होती.

जगभरात हातांचे वाटप...
लातूर : रोटरी, अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अपंगांना अत्याधुनिक कृत्रिम हातांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या शिबिरात पाचशे अपंगांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दीडशे जणांना हातांचे वितरण करण्यात आले. आणखीन ४० जणांना लवकरच अत्याधुनिक कृत्रिम हातांचे वाटप करण्यात येणार आहे.
श्री अष्टविनायक मंदिरात रविवारी सायंकाळी कृत्रिम हात वाटपासाठी शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे शब्बीरभाई जामनगरवाला होते. यावेळी विवेकानंद रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक कुकडे, अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी, प्रदीप मुनोत, शोभा नहार, महापौर अख्तर शेख, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, माजी महापौर स्मिता खानापुरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अमेरिकेतील एलन मिडोज या १८ वर्षीय मुलीचे निधन झाले होते. आपल्या मुलीच्या स्मरणार्थ तिच्या इंजिनिअर असलेल्या वडिलाने एलएन-४ या अत्याधुनिक कृत्रिम हाताची निर्मिती केली. रोटरी इंटरनॅशनल क्लबमार्फत जगभरातील अपंगांना अशा मोफत हातांचे वाटप करण्यात येते. एलएन-४ कृत्रिम हात बसविण्यासाठी कोपराखाली ४ इंच हात असणे आवश्यक आहे.
४या हातांविषयी राजेश गुप्ता, शोभा नहार, शब्बीरभाई जामनगरवाला, प्रदीप मुनोत यांनी माहिती दिली. लातुरात हे शिबीर झाल्याने अपंगांना कृत्रिम हातांची उपलब्धी झाली.