शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जागतिक संग्रहालय दिन : पर्यटन राजधानीतील ऐतिहासिक संग्रहालये पर्यटकांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 17:25 IST

संग्रहालयांचा प्रचार व प्रसार करण्यात कमी पडतेय यंत्रणा

औरंगाबाद : शालिवाहन राजवटीची समृद्धता उपभोगलेले आपले शहर इतिहासाच्या अनेक खाणाखुणा जपून आहे. इथल्या इतिहासप्रेमींनी गतकाळाचे वैभव सांगणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तू सांभाळल्या, जपल्या. आज या वस्तूंची संग्रहालयेही शहरात उभी आहेत; पण संग्रहालयांची ओळख निर्माण करण्यात यंत्रणा कमी पडल्यामुळे या ऐतिहासिकनगरीतील संग्रहालये अजूनही पर्यटकांच्या प्रतीक्षेतच आहेत.

१८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहराच्या दृष्टीने तर या दिवसाचे महत्त्व अधिकच आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संग्रहालय, सोनेरी महाल परिसरातील राज्य पुरातत्व विभागाचे संग्रहालय, महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय अशी अतिशय समृद्ध वारसा जपणारी संग्रहालये सध्या शहरात आहेत. असे असतानाही तुरळक पर्यटक संग्रहालये पाहण्यासाठी येतात. कारण या शहरात संग्रहालये आहेत, हीच गोष्ट मुळात त्यांना माहिती नसते.

रेल्वेस्टेशन, बसस्थानक, विमानतळ यासारख्या ठिकाणी कोठेही पुरातन वस्तू संग्रहालयाबाबत माहिती देणारे फलकलावलेले नाहीत. एमटीडीसीच्या संकेतस्थळावरही या संग्रहालयांचा उल्लेख नाही. त्यामुळे पर्यटक इथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. विद्यापीठातील अतिशय संपन्न असणाऱ्या संग्रहालयात दरवर्षी १० हजारांच्या आसपास पर्यटक भेट देतात. दरवर्षी अजिंठा-वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. या ऐतिहासिक ठेवींबाबत शासन दरबारी असणारी अनास्था हेही यामागचे प्रमुख कारण आहे, असे म्हटले जाते.

संग्रहालयांची माहितीपुस्तिका तयार व्हावीमुळात आपल्याकडच्या अजिंठा-वेरूळ या जगप्रसिद्ध स्थळांचीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटकांमध्ये नीट प्रसिद्धी होत नाही. असे असताना संग्रहालयांचा प्रचार आणि प्रसार करणे तर खूपच दूरचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संग्रहालयातील एकेक वस्तू पीएच.डी. करण्यासारखी आहे. या वस्तू जेव्हा पर्यटक पाहतात, तेव्हा ते आम्हाला सांगतात की या संग्रहालयांचा उल्लेख त्यांना पर्यटन विभागाच्या कोणत्याही पुस्तिकेत आढळलेला नाही. आपल्याकडील संग्रहालयांबाबत पर्यटकांना माहितीच नसते. त्यामुळे संग्रहालयांची योग्य माहितीपुस्तिका तयार करणे, एखादे संकेतस्थळ तयार करून त्यावर पुरेशी माहिती देणे यासारखे काम होण्याची गरज आहे. याशिवाय आपले शहर औद्योगिक दृष्ट्या पुढे आणण्याकडेच राजकारण्यांचा कल आहे. पर्यटनाच्या दृष्टीने शहराचा विकास करू पाहणारा नेता आपल्याक डे नाही. - दुलारी कुरेशी

विशेष उपक्रम आयोजित करावेतप्रत्येक संग्रहालयांमध्ये ऐतिहासिक वस्तूंचा एक विशिष्ट ठेवा असतो. जो काही खास वेळेतच काढला जातो. उदाहरणार्थ दिल्ली येथील संग्रहालयात खास ‘निजाम ज्वेलरी’चे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येते, जे वर्षातून काही दिवसच असते, असे काही उपक्रम आपल्या शहरातील संग्रहालयांमध्ये झाले पाहिजेत. शाळा, महाविद्यालयांच्या सहली येथे आवर्जून नेल्या पाहिजेत, तसेच ज्या संग्रहालयाचे जे वैशिष्ट्य असेल त्यावर भाष्य करणाऱ्या तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करणे, अशा उपक्रमांच्या माध्यमातून शहरातील संग्रहालयांचा प्रचार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. - शिवाकांत वाजपेयी, उपअधीक्षक,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनhistoryइतिहास