शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जागतिक मूत्रपिंड दिन : मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळेच येऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:52 IST

मराठवाड्यात प्रत्यारोपणासाठी ३०८ लोकांना प्रतीक्षा मूत्रपिंडाची

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : औरंगाबाद विभागात म्हणजे मराठवाड्यात तब्बल ३०८ जण मूत्रपिंड मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पुढे आली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. मात्र, आरोग्याची योग्य काळजी घेतली, तर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वेळच येणार नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिन म्हणून पाळण्यात येतो. सामान्य लोकसंख्येच्या ३ पैकी एका व्यक्तीस मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता असते, अशी माहिती आरोग्य संघटनांच्या आकडेवारीवरुन समोर येते. त्यासाठी अनेक कारणे आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर डायलिसिस (रक्तशुद्धीकरण) आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण या सारखे उपचार करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली, तर डायलिसिस, प्रत्यारोपणाची परिस्थिती टाळणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

मूत्रपिंड विकाराची लक्षणे- भूक मंदावणे.- थकवा जाणवणे.- रक्तदाब खूप वाढणे.- अंगावर सूज येणे.- मूत्रपिंडातून रक्त, पू जाणे.- मूत्रपिंडाच्या मागील भागात पाठीत दुखणे.

यांना सर्वाधिक धोका- मधुमेह असणे.- उच्च रक्तदाब असणे.- स्थूलता.- कुटुंबात एखाद्या व्यक्तीस मूत्रपिंड विकार.

ही घ्या काळजी- नियमितपणे व्यायाम करणे.- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे.- स्थूलता वाढू न देणे.- रक्तदाब १४०-९० च्या खाली ठेवणे.- जंकफूड टाळणे.- विनासल्ला पेनकिलर घेणे टाळण- रोज किमान अडीच लिटर पाणी पिणे.- मूतखड्याचा वेळीच उपचार करणे.

असा वाढतोय आलेख- मराठवाड्यात आॅगस्ट २०१९ मध्ये २७६ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत होते. - रुग्णांची संख्या जानेवारी २०२० मध्ये २९३ वर गेली आहे.- मार्च महिन्याच्या १० तारखेपर्यंत ही संख्या आता ३०८ वर पोहोचली आहे. 

योग्य आहार घ्यावामूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. दररोज २ कि.मी. चालले पाहिजे, शक्य झाले तर धावले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. - डॉ. सुहास बावीकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

विनासल्ला औषधी नकोमूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी वर्षातून एका तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी, विशेषत: पेनकिलर घेता कामा नये. रोज किमान अडीच लिटर पाणी प्यावे.- डॉ. रवींद्र भट्टू, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर